पंतप्रधान कार्यालय
भारतीय परंपरा आणि मूल्यांचा प्रचार केल्याबद्दल दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या 'सुप्रभातम्' या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
08 DEC 2025 11:03AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या 'सुप्रभातम्' या कार्यक्रमाचे कौतुक केले असून, हा कार्यक्रम सकाळची उत्साही सुरुवात करतो, असे त्यांनी म्हटले आहे. योग साधनेपासून ते भारतीय जीवनशैलीच्या विविध पैलूंपर्यंतच्या अनेक विषयांचा या कार्यक्रमात समावेश असतो, असे त्यांनी नमूद केले आहे.
भारतीय परंपरा आणि मूल्यांशी जोडलेला हा कार्यक्रम ज्ञान, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा एक अनोखा संगम साधतो, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी 'सुप्रभातम्' कार्यक्रमातील एका विशेष भाग, म्हणजेच 'संस्कृत सुभाषितम्' ठळकपणे अधोरेखित केला आहे. हा भाग भारताच्या संस्कृती आणि वारशाबद्दल नवीन जागरूकता निर्माण करण्यात मदत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आजचे सुभाषितम् प्रेक्षकांसोबत सामायिकही केले आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर स्वतंत्रपणे सामायिक केलेला संदेश :
दूरदर्शनवर प्रसारित होणारा सुप्रभातम् कार्यक्रम सकाळच्या वेळी ताजेपणाची अनुभुती देतो. यात योगसाधनेपासून ते भारतीय जीवनशैलीपर्यंतच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा केली जाते. भारतीय परंपरा आणि मूल्यांवर आधारित हा कार्यक्रम ज्ञान, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा अद्भुत संगम आहे.
https://www.youtube.com/watch?v=vNPCnjgSBqU”
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2200269)
आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam