पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त,दिव्यांग व्यक्तींना प्रतिष्ठा,सुलभ प्रवेश आणि संधी बहाल करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बंधू आणि भगिनींना सन्मान, सुलभ प्रवेश आणि संधी देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दिव्यांगांनी त्यांच्या सर्जनशीलता आणि दृढनिश्चयामुळे विविध क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे आणि आपल्या राष्ट्रीय प्रगतीला लक्षणीयरीत्या समृद्ध केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. "गेल्या काही वर्षात भारताने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक कायदे, अनुकूल पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणे आणि सहायक तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेषी संकल्पनासह विविध उपक्रम राबवले आहेत, येणाऱ्या काळात आम्ही यादृष्टीने अधिक कार्य करु" असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आम्ही दिव्यांग बंधू आणि भगिनींना नेहमीच सन्मान, सुलभ प्रवेश आणि संधी देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे, त्यांची सर्जनशीलता आणि दृढनिश्चयाबद्दल त्यांचे धन्यवाद. त्याच वेळी, त्यांनी आपल्या राष्ट्रीय प्रगतीला लक्षणीयरीत्या समृद्ध केले आहे. गेल्या काही वर्षात भारताने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक कायदे, अनुकूल पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणे आणि सहायक तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेष यांसारखे विविध उपक्रम राबवले आहेत, येणाऱ्या काळात आम्ही यादृष्टीने अधिक कार्य करू."
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198402)
आगंतुक पटल : 8