दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संचार साथी ॲपच्या नियमांसंदर्भातल्या शंका दूर केल्या

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2025 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025

केंद्रीय दळणवळण तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज संचार साथी ॲप हे संपूर्णपणे लोकसत्ताक आणि पूर्णपणे ऐच्छिक आहे असे सांगत या ॲपच्या नियमांसंदर्भातल्या शंका दूर केल्या. ते पुढे म्हणाले की वापरकर्ते या ॲपमधील सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपापल्या सोयीने हे ॲप कार्यरत करू शकतात तसेच त्यांना पाहिजे तेव्हा हे ॲप कोणत्याही वेळी त्यांच्या साधनांमधून निष्क्रिय करू शकतात अथवा पूर्णपणे काढू टाकू शकतात.

नागरीक-प्रथम आणि  गुप्तता राखण्याच्या दृष्टीने सुरक्षित मंच ग्राहकांचे संरक्षण करणे ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असून संचार साथी हे ॲप प्रत्येक मोबाईल धारकाला सक्षम करण्याच्या दृष्टीने संरचित आहे हे केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी अधोरेखित केले. संचार साथी हे एक ॲप आहे तसेच एक पोर्टल देखील आहे आणि ते नागरिकांना पारदर्शक,वापरण्यासाठी सोप्या साधनांच्या माध्यमातून सुरक्षित राहणे शक्य करते. लोकभागीदारीच्या दिशेने टाकलेले हे असे एक महत्त्वाचे पाऊल आहे जेथे नागरिक त्यांची स्वतःची डिजिटल परिसंस्था सुरक्षित राखण्यासाठी सक्रियतेने सहभागी होऊ शकतात, ते म्हणाले.

संचार साथी ॲपचे प्रभाव आणि मापनयोग्य निष्कर्ष

संचार साथीचे कार्य सुरु झाल्यापासून या ॲपने खालील सशक्त निष्कर्ष दिले आहेत:

21.5 कोटींहून अधिक पोर्टल भेटी

1.4 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले

1.43 कोटींपेक्षा जास्त मोबाईल जोडण्या नागरिकांनी  माझा नंबर नाही हा पर्याय निवडत रद्द केल्या

26 लाख हरवलेले/चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यात यश आणि 7.23 लाख मोबाईल यशस्वीपणे योग्य धारकांकडे सुपूर्द

40.96 लाख बेकायदेशीर जोडण्या नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या मदतीने रद्द करण्यात आल्या.

घोटाळ्यांशी संबंधित 6.2 लाख आयएमईआय ब्लॉक करण्यात आले.

₹475 कोटी रुपयांचा संभाव्य आर्थिक तोटा आर्थिक घोटाळे जोखीम निदर्शकाच्या (एफआरआय)माध्यमातून रोखण्यात यश  

सायबर सुरक्षा आणि नागरिकांचे संरक्षण यांना केंद्रस्थान

संचार साथी हे ॲप वापरकर्त्यांना संशयित घोटाळ्यांची सूचना थेट कॉल लॉग मधून देणे शक्य करते आणि त्यायोगे जागरुक नागरिकांना कमी माहिती असलेल्या नागरिकांचे संरक्षण करण्यास सक्षम बनवते .

भाषण संपवताना केंद्रीय मंत्री सिंदिया म्हणाले,'प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल संरक्षण देणे याला आम्ही  सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. संचार साथी हे ऐच्छिक, पारदर्शक ॲप असून देशाच्या सायबरसुरक्षिततेत वाढ करतानाच भारताच्या मोबाईल ग्राहकांच्या संरक्षणात वाढ करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वापरकर्त्यांना हे ॲप सक्रीय करण्याचे तसेच कधीही ते काढून टाकण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असून गोपनीयतेशी कोणतीही तडजोड न करता सुरक्षेची सुनिश्चिती करण्यात आली आहे.'

सुषमा काणे/ संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


 


(रिलीज़ आईडी: 2197738) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Telugu , Kannada