iffi banner

इफ्फीमध्ये थायलंडच्या 'अ यूजफुल घोस्ट' या विलक्षण चित्रपटाने आंतरराष्ट्रीय विभागाचा शानदार समारोप


व्हेन लव्ह रिटर्न अॅज अ व्हॅक्यूम क्लीनर: एका मनमोहक अलौकिक कथेची निर्मिती

दिग्दर्शक रत्चापूम आणि चमूने चित्रपटाच्या दृश्यात्मक अल्लडपणा आणि भावनिक गाभा उलगडून दाखवला

#IFFIWood, 28 नोव्‍हेंबर 2025

 

इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागासाठी यापेक्षा अविस्मरणीय समारोपाची  अपेक्षा केली जाऊ  शकत नाही. थायलंडची अधिकृत ऑस्कर एन्ट्री आणि कान्समध्ये ग्रँड प्रिक्स विजेता 'अ युजफूल घोस्ट ' च्या  टीमने आज पत्रकार परिषदेत त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या स्वभावाचे  प्रतिबिंब असलेले विचित्र, उदासीनता, सामाजिक भाष्य आणि विनोदाचे दुर्मिळ मिश्रण उलगडून दाखवले.

दिग्दर्शक रत्चापूम बूनबंचचोक, सहयोगी निर्माता तनाडे अमोरनपियालेर्क, अभिनेता विसारुत होमहुआन आणि सिनेमॅटोग्राफर सॉन्ग पासिट यांनी मंचावर एका अजब कोमल विश्वाची कहाणी उलगडली ज्यात एक शोकाकुल पती त्याच्या मृत पत्नीचा व्हॅक्यूम क्लिनरमध्ये पुनर्जन्म झालेला पाहतो.

“कोणाला माहित होते की एक वेडी कल्पना इतकी दूर पोहचू  शकते?” — रचपूम

चित्रपटाच्या जागतिक प्रवासावर बोलताना, दिग्दर्शक रचपूम यांनी आपला अविश्वास आणि आनंद सामायिक केला:

“इतकी  वेडी कल्पना असलेला चित्रपट इतका दूरपर्यंत जाऊ  शकतो आणि इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो अस कोणी विचार केला  असेल?” त्यांनी सांगितले की चित्रपटाची सुरुवात सुरुवातीला मानवी रूपात दिसणाऱ्या भूताच्या पारंपारिक चित्रणाने झाली होती. मात्र  ही कल्पना परिचित वाटली, त्यात नवीन काही नव्हते.  तेव्हा त्यांनी अनपेक्षित गोष्टीला स्वीकारले: एक भूत जे व्हॅक्यूम क्लिनरमध्ये  पुनर्जन्म घेते.

त्यांनी स्पष्ट केले की, ही अनोखी  निवड अत्यंत प्रतीकात्मक होती. "थायलंडमध्ये धूळ प्रदूषण ही एक अतिशय वास्तविक समस्या आहे  , ती चित्रपटातील मुख्य पात्राचा जीव घेते आणि व्हॅक्यूम क्लिनर तिच्या मृत्यूच्या कारणाचे  एक काव्यात्मक उत्तर  बनतो." रॅचपूम यांनी सांगितले की त्यांनी जगभरातील भूतांच्या चित्रीकरणाचा अभ्यास करण्यात बराच वेळ घालवला, ज्यात जड मेकअप वापरणाऱ्यांपासून ते सूक्ष्म अदृश्य उपस्थितीचा समावेश आहे , शेवटी काहीतरी वेगळे , शांत आणि अधिक जिव्हाळ्याच्या गोष्टींकडे आकर्षित झाले. या निर्णयाने अनपेक्षित विज्ञान-कल्पनारम्य घटक समाविष्ट केले , जे त्याने खेळकरपणे मान्य  केले की ते कोणत्याही जाणीवपूर्वक नियोजनाचा  भाग नव्हते.

 

“सिनेमॅटिक नसण्याची भीती बाळगू नका"- सिनेमॅटोग्राफर सॉन्ग पासिट

सिनेमॅटोग्राफर सॉन्ग पासिट यांनी चित्रपटाच्या दृश्य भाषेचे वर्णन गांभीर्य आणि मूर्खपणा यामध्ये   जाणीवपूर्वक केलेले तांडव असे केले. “आमचा मार्गदर्शक विचार 'सिनेमॅटिक नसण्याची भीती बाळगू नका' असा होता,” असे ते म्हणाले.

त्यांनी स्पष्ट केले की टीमने विचित्र कोन, चंचल  रचना आणि गडद  रंग विशेषतः लाल रंग वापरले, असा रंग जो ज्वलंत राहावा असा आग्रह दिग्दर्शकाने धरला होता. प्रेक्षकांना मजेदार, रहस्यमय आणि नेहमीच्या चाकोरीबाहेरील जगात घेऊन जाणे  हे ध्येय होते.

 

थायलंडच्या चित्रपट परिदृश्याबद्दल बोलताना

सहाय्यक  निर्माते तनाडे अमोरनपियालेर्क यांनी थाई चित्रपटांच्या पडद्यामागील जग अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की नवीन चित्रपट निर्मात्यांची एक नवीन लाट उदयास येत आहे मात्र चित्रपट उद्योग अजूनही दरवर्षी थिएटरमध्ये अवघे  30 चित्रपटच  प्रदर्शित करतो,आणि या अस्थिर परिसंस्थेवर  हॉलिवूड चित्रपटांचे वर्चस्व आहे.

रचापूम पुढे म्हणाले की शैलीची विविधता मर्यादित आहे आणि जरी चित्रपट "निखळ  मनोरंजन" करणारे असू शकतात, तरी त्यांचे वैयक्तिक मत आहे की सिनेमात सांगण्यासारखे काहीतरी असायला हवे.

 

“या भूमिकेने माझ्यासाठी अनेक गोष्टी बदलल्या ” — अभिनेता विसारुत होम्हुआन

अभिनेता विसारुत होम्हुआनसाठी, अ युजफुल घोस्ट आव्हानात्मक आणि करिअर ठरवणारा दोन्ही होता. “थायलंडमध्ये अभिनेता असणे कठीण आहे,” असे त्याने कबूल केले. “मी टीव्ही, टिकटॉक, सर्वत्र काम केले आहे. फारशा संधी नाहीत. हा चित्रपट माझ्यासाठी एक प्रशस्त  मार्ग होता, ज्यामुळे लोक मला एक चित्रपट अभिनेता म्हणून ओळखू लागले.” 

संपूर्ण  टीमने 'अ युजफुल घोस्ट' चे वर्णन  विरोधाभासांवर आधारित चित्रपट असे केले,  एक अशी कथा जी विनोदी आहे आणि भयावह देखील आहे, काल्पनिक आहे पण वास्तविक पर्यावरणीय मुद्द्यांमध्ये रुजलेली आहे आणि आपली  विलक्षणता न गमावता मनाचा ठाव घेणारी देखील आहे.

पत्रकार बैठक संपताच, चित्रपटाने जगाचे  लक्ष का वेधले आहे हे स्पष्ट झाले: तो एकाच वेळी विचित्र, प्रामाणिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रासंगिक देखील आहे. आणि असे करताना, त्याने इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागाला असा समारोप दिला जो आनंददायी आणि अविस्मरणीय दोन्ही होता.

ट्रेलर:

पत्रपरिषद  लिंक:

इफ्फीविषयी

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच  कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

For more information, click on:

IFFI Website: https://www.iffigoa.org/

PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/

PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji

* * *

PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्‍पलकट्टी/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2195919   |   Visitor Counter: 5

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Konkani , Malayalam