इफ्फी 2025: ‘माय स्टॅम्प’ उत्साह – चित्रपटप्रेमींसाठी अविस्मरणीय आठवण
कला, सिनेमा आणि आठवणी जतन करण्याची संधी – इफ्फी माय स्टॅम्प’सह तुमचे छायाचित्र टपाल तिकीटावर
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2025
गोव्यातील 56 व्या इफ्फी- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सांगतेकडे वाटचाल करत असतांना, या वर्षीचा महोत्सव फक्त सिनेमातील उत्कृष्ट कलाकृतींपर्यंत मर्यादित राहिला नाही, तर वैयक्तिकदृष्ट्या तो एक संस्मरणीय अनुभवही ठरत आहे. इफ्फीच्या 56 व्या आवृत्तीत इंडिया पोस्टने आपली ‘माय स्टॅम्प’ सेवा सुरु केली. चित्रपटप्रेमी आणि टपाल तिकीट संकलकांमध्ये इंडिया पोस्टकडून जारी केलेल्या ‘वैयक्तिक माय स्टॅम्प फोटो’ साठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. महोत्सवात इंडिया पोस्ट चा स्टॉल प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला, आणि त्यांनी इफ्फी-संकल्पनेवर आधारित टपाल तिकीट बनवण्याची संधी अनुभवली.

56 व्या इफ्फीसाठी इंडिया पोस्टने महोत्सवाला समर्पित खास ‘माय स्टॅम्प’ टेम्पलेट प्रकाशित केले आहे. या वैयक्तिकृत टपाल तिकिटाद्वारे उपस्थितांना त्यांच्या छायाचित्राला या विशेष इफ्फी-संकल्पना असलेल्या टेम्पलेटवर मुद्रित करून टपाल वैध स्टॅम्पच्या एका शीट स्वरूपात मिळवता येते. चित्रपटप्रेमी, टपाल तिकीट संकलक आणि महोत्सवातील पाहुण्यांसाठी हा ‘माय स्टॅम्प’ इफ्फी 2025 चे अमूल्य स्मृतिचिन्ह ठरते, ज्यामुळे ती एक सुंदर आठवण म्हणून जतन होईल.

इंडिया पोस्टने महोत्सवात खास दालन उभारले असून, उपस्थितांना त्यांचा वैयक्तिक ‘माय स्टॅम्प’ तयार करणे सोपे झाले आहे. इंडिया पोस्टच्या भारतीय चित्रपट वारशाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राबवलेला हा उपक्रम कला-संस्कृतीच्या रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. इफ्फी माय स्टॅम्प’ हे फक्त टपाल तिकीट नाही, तर चित्रपट, कला आणि वैयक्तिक आठवणींचा एक सुंदर संगम आहे, महोत्सवात ही एक सर्वाधिक लक्षवेधक आणि लोकप्रिय उपक्रम ठरत आहे.

* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195656
| Visitor Counter:
5