स्मृती, लवचिकता आणि जगण्याच्या धडपडीची कथा इफ्फीच्या मंचावर केंद्रस्थानी
हरवलेल्यांचे स्मरण: ‘फॉरेन्सिक्स’ मध्ये वैयक्तिक वेदना होते राजकीय
मोझांबिक मधील वास्तव कहाण्या ‘कु हांदझा’ मध्ये झाल्या सजीव
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
गोवा येथे सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज चित्रपट रसिकांना कोलंबिया आणि मोझांबिक मधील चित्रपटांच्या माध्यमातून, अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या लोकांच्या जीवनाची दुर्मिळ झलक पाहायला मिळाली. ‘फॉरेन्सिक्स’ आणि ‘कु हांदझा’ या चित्रपटांच्या निर्मात्यांसोबत आयोजित पत्रकार परिषदेने स्मृती आणि लवचिकते सोबतच कलेचा देखील अविष्कार घडवणाऱ्या कथाकथनाचा मास्टरक्लास घेतला.
फेदेरिको अतेहोर्तूआ आर्तेगा यांचा ‘फॉरेन्सिक्स’ हा एक धाडसी प्रयोगशील चित्रपट आहे ज्यामध्ये तीन कथा एकत्र गुंफलेल्या आहेत: मृत ट्रान्सजेंडर महिलेच्या जीवनाची पुनर्बांधणी करणारी महिला दिग्दर्शक, हरवलेल्या नातेवाइकाबद्दल दुःख करणारे फेदेरिकोचे स्वतःचे चित्रपट निर्मितीचे कुटुंब आणि फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट कॅरेन क्विंटेरो यांची साक्ष. यातून निर्माण झालेला हा चित्रपट वैयक्तिक बाबींना राजकीय स्वरूप मिळून कोलंबियाचा अशांत भूतकाळ आणि दिसेनासे झालेल्यांनी मागे सोडलेल्या जखमा यांचा शोध घेतो.

फेदेरिको यांनी त्यांच्या या कलाकृतीला चालना देणाऱ्या वास्तव जीवनातील संबंधांबद्दल उत्कटतेने सांगितले. “ही कोलंबियातील अनेकांची कहाणी आहे. देशातील प्रत्येकाला असा कुणीतरी माहित आहे जो नंतर हरवलेला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लोकांनी, ‘माझे काका, माझा भाऊ’ असे म्हणत हात उंचावले, काहीजण रडले देखील,” त्यांनी आठवण सांगितली. “एखादी कथा लोकांपर्यंत इतक्या खोलवर पोहोचते हे खरोखर खूप विनयशील बनवणारे आहे. स्मृती आवश्यक आहे, ती तरुण पिढ्यांना संघर्षाच्या मानवी किमतीबाबत शिकवण देते.” फेदेरिको यांच्या मते, या चित्रपटासाठी केलेले संशोधन आव्हानात्मक आणि तितकेच महत्त्वाचे होते. आणि एकतेच्या जाणीवेच्या शोधासाठी हरवलेल्यांचा शोध घेणाऱ्या लोकांसाठी हा चित्रपट एक मंच झाला.

जगभरात, जसिंटा मारिया दे बरोज दा मोटा पिंटो आणि रुई सीझर दे ऑलिव्हीएरा सिमॉस यांच्याद्वारे निर्मित ‘कु हांदझा’ या चित्रपटाने वास्तवतेचा एक वेगळा स्वाद मिळवून दिला. मोझांबिकमध्ये घडणारी चित्रपटाची कथा असामान्य परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या सामान्य लोकांचे चित्रण करते. बेंजामिन त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड करतो आहे, फिलीमोन कुटुंब आणि युद्धकालीन कर्तव्यांमध्ये तोल साधत आहे आणि युलालिया बाळंतपणानंतर लगेचच कचराकुंडीच्या कामावर परतत आहे. जसिंटा यांनी सांगितले की, चित्रपटाचा अस्सलपणा त्यातील लोकांमधून येतो, कारण त्या अभिनेत्री नाहीत तर चित्रपटीय कथेमध्ये गुंफलेल्या खऱ्या कहाण्या आहेत. “मोझांबिक हे दिग्दर्शकासाठी त्याचे दुसरे घरच झाले होते. आम्ही त्यांच्यापैकीच एक असल्याप्रमाणे आम्हांला त्यांची आयुष्ये अत्यंत प्रामाणिकपणे चित्रित करायची होती,” त्या म्हणाल्या.

भिन्न वास्तवांमध्ये रुजलेले हे दोन्ही चित्रपट दुर्लक्षित लोकांच्या दुःखाला वाचा फोडण्याच्या त्यांच्या क्षमतेत एकत्र येतात. ‘फॉरेन्सिक्स’ हा चित्रपट कोलंबियातील दुःख आणि राजकीय उलथापालथ उलगडून दाखवतो तर ‘कु हांदझा’ हा चित्रपट मोझांबिकमधील जीवनातील लवचिकता आणि दैनंदिन शौर्याचे दर्शन घडवतो. एकत्रितपणे, हे चित्रपट प्रेक्षकांना अशी आठवण करून देतात की चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन करण्याचीच नव्हे तर सीमापार मानवी अनुभवांचे दस्तावेजीकरण करण्याची, त्यांना जोडून घेण्याची तसेच प्रकाशित करण्याची देखील क्षमता असते.
सदर सत्राच्या अखेरीस हे स्पष्ट झाले: हे चित्रपट केवळ कथा सांगण्यापेक्षा अधिक काम करतात. ते जगांच्या दरम्यान सेतू बांधून प्रेक्षकांना जेथे त्यांनी कधीही भेट दिलेली नाही मात्र ते खोलवर अनुभवू शकतात अशा ठिकाणी असलेले संघर्ष, जगण्याची धडपड आणि आशा पाहण्याची संधी देतात.
पत्रकार परिषदेची लिंक:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195090
| Visitor Counter:
8