गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'राज्यघटना दिना'निमित्त बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीतील सर्व सदस्यांना वाहिली आदरांजली ; नागरिकांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2025 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'संविधान दिना' निमित्त बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि संविधान समितीतील सर्व मान्यवर सदस्यांना आदरांजली वाहिली आहे आणि सर्व नागरिकांना या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या' एक्स' पोस्टमध्ये, अमित शहा म्हणाले आहेत की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या राज्यघटनेकडून प्रत्येक नागरिकाला समान संधी, सन्माननीय जीवन, राष्ट्रीय कर्तव्ये आणि अधिकार प्रदान केले आहेत, जेणेकरून ज्यामुळे एक शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याचा मार्ग सुकर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'संविधान दिन' सुरू करून देशातील नागरिकांना लोकशाही मूल्यांबद्दल अधिक जागरूक केले आहे,असे त्यांनी पुढे अधोरेखित केले आहे.
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2194674)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam