’दास्तान-ए-गुरु दत्त’ या संगीतमय कार्यक्रमातून दिग्गज चित्रपट निर्मात्याचा प्रवास जिवंत झाला
‘दास्तान-ए-गुरु दत्त’ ने संगीत आणि आठवणींच्या अविस्मरणीय सादरीकरणाने इफ्फी’मधील प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या - इफ्फीच्या पाचव्या दिवशी, गोव्यातील कला अकादमीमध्ये ‘दास्तान-ए-गुरु दत्त’ नावाचा एक विशेष संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. फौजिया आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना प्रसिद्ध चित्रपट निर्माते गुरु दत्त यांच्या जीवनप्रवासाचा आणि सर्जनशील वारशाचा एक तल्लीन करणारा कलाविष्कार पाहायला मिळाला.
सत्राची सुरुवात प्रख्यात चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केली. रवैल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील गुरु दत्त यांच्या योगदानाबाबत आपले विचार मांडले. त्यानंतर, फौजिया यांनी आपल्या मोहक कथानकातून प्रेक्षकांना गुरु दत्त यांच्या जीवनप्रवासात नेले. त्यांच्या कथनासोबत लतिका जैन यांचे गायन, सुदीप यांचा तबला, ऋषभ यांचे हार्मोनियम आणि अंकित यांचे गिटार साथीला होते. आशा बत्रा यांच्या संशोधन सहकार्याने निर्मित या विशेष कार्यक्रमाचे नेतृत्व विकास जालान यांनी केले.

गुरु दत्त यांच्या प्रारंभीच्या आयुष्याचा मागोवा
फौजिया यांनी गुरु दत्त यांच्या कोलकात्यातील बालपणापासून आपल्या कथानकाची सुरुवात केली, ज्यात गुरु दत्त यांना मातृकुळाकडून मिळालेल्या कलात्मक मार्गदर्शनावर आणि प्रेरणांवर प्रकाश टाकला. फौजिया यांनी अल्मोडा येथील उदय शंकर सांस्कृतिक केंद्रातील गुरु दत्त यांच्या सुरुवातीच्या काळाचे वर्णन केले. गुरु दत्त यांनी वयाच्या 16 व्या वर्षी प्रवेश घेतला होता. या संस्थेत व्यतीत केलेला काळ गुरुदत्त यांच्या कलात्मक जडणघडणीत आणि त्यांच्या कलाकृतींवरील प्रेमाला आकार देण्यात महत्त्वाची ठरला.
देव आनंद यांच्याशी असलेली मैत्री
या कार्यक्रमात गुरु दत्त यांच्या देव आनंद यांच्याशी असलेल्या महत्त्वपूर्ण मैत्रीवरही प्रकाश टाकण्यात आला. दोघांच्याही आरंभीच्या काळात पुण्यातील प्रभात स्टुडिओत झालेल्या या मैत्रीने दोन्ही कलाकारांमध्ये एक दृढ नाते निर्माण झाले आणि आपण निर्मिती क्षेत्रात जेव्हा कधी पाऊल टाकू तेव्हा एकमेकांना सहकार्य करण्याचे वचन त्यांनी दिले. या वचनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित सर्जनशील भागीदारींपैकी एकीची सुरुवात झाली.
मुंबईतील प्रवास आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून झेप
त्यानंतर फौजिया यांनी गुरु दत्त यांच्या मुंबईतील दिवसांचे वर्णन केले. याच काळात देव आनंद यांनी नवकेतन फिल्म कंपनीची स्थापना केली होती. एकमेकांना दिलेले वचन पूर्ण करताना, देव आनंद यांनी गुरु दत्त यांना कंपनीचा पहिला चित्रपट "बाजी" चे दिग्दर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. इथूनच गुरु दत्त यांच्या गौरवशाली कारकिर्दीची सुरुवात झाली. या चित्रपटादरम्यान गुरु दत्त यांनी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी यांना ‘जॉनी वॉकर’ हे पडद्यावरचे प्रसिद्ध नाव दिले.
बाजीच्या यशानंतर, गुरु दत्त यांनी कालातीत क्लासिक्स तयार केले, ज्यात जागतिक चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "प्यासा" या चित्रपटाचा समावेश आहे.
वैयक्तिक आयुष्याची झलक
या कार्यक्रमातील कथानकात गुरु दत्त यांच्या वैयक्तिक जीवनावरही भर देण्यात आला. ‘कागज के फूल’ या चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशानंतर त्यांच्या भावनिक संघर्षांवर आणि शेवटच्या काळात त्यांना आलेल्या नैराश्य आणि एकाकीपणाचाही फौजिया यांनी उल्लेख केला.

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या संगीतमय कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. लतिका जैन यांच्या भावपूर्ण आणि सुरेल सादरीकरणामुळे ही कथा अधिक प्रभावी आणि हळवी झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी, निर्माते रवी कोट्टारकर यांनी ‘दास्तान-ए-गुरु दत्त’च्या संपूर्ण चमूचा सन्मान केला. भारतातील सर्वात गौरवशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एकाचा वारसा जतन करण्यात आणि सुंदर सादरीकरण केल्याबद्दल या चमूचा गौरव करण्यात आला.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2191742
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190381
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193817
| Visitor Counter:
6