पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी लाचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना वाहिली आदरांजली

Posted On: 24 NOV 2025 2:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांचे स्मरण केले, आदरांजली वाहिली आणि धैर्य, देशभक्ती आणि खऱ्या नेतृत्व यांचे ते प्रतीक होते, असे त्यांचे वर्णन केले आहे.

लचित बोरफुकन यांचे शौर्य देशभरातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील,असे  मोदी यांनी म्हटले आहे. आसामच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे रक्षण करण्यात तसेच एकता आणि शाश्वत मूल्यांचे समर्थन करण्यात लचित बोरफुकन यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

आपल्या आणखी एका पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले आहे,

“धैर्य, देशभक्ती आणि खऱ्या नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या,लचित बोरफुकन यांचे लचित दिनानिमित्त, आपण स्मरण करु या. त्यांचे शौर्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आसामच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.”

“লাচিত দিৱসৰ দিনা আমি সাহস, দেশপ্ৰেম আৰু প্ৰকৃত নেতৃত্বৰ প্ৰতীক লাচিত বৰফুকনক স্মৰণ কৰো।  তেওঁৰ বীৰত্বই প্ৰতিটো প্ৰজন্মক অনুপ্ৰাণিত কৰি আহিছে।  অসমৰ অনন্য সংস্কৃতি ৰক্ষাৰ ক্ষেত্ৰত তেওঁ গুৰুত্বপূৰ্ণ ভূমিকা পালন কৰিছিল।”

 

* * *

गोपाळ चिप्पलकट्टी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे


(Release ID: 2193502) Visitor Counter : 9