56 व्या इफ्फीमध्ये पत्रकार परिषदेत तेरेसाच्या 'आत्म -शोधाच्या प्रवासाचा' मागोवा घेण्यात आला
इफ्फीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाच्या चित्रपटाच्या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी माध्यमांशी साधला संवाद
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2025
कालच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकांकडून मिळालेली उत्साहजनक प्रशंसा आणि आश्चर्यचकित करणाऱ्या अनुभवानंतर, दिग्दर्शक गॅब्रिएल मस्कारो यांनी साउंड डिझायनर्स मारिया अलेजांड्रा रोजास, आर्टुरो सालाझार आरबी आणि अभिनेत्री क्लॅरिसा पिनहेरो, रोजा मालागुएटा यांच्यासह आज 56 व्या इफ्फी मध्ये पत्रसूचना कार्यालयाच्या प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये माध्यमांची भेट घेतली आणि त्यांच्या 'द ब्लू ट्रेल' चित्रपटाच्या प्रवासाचा मागोवा घेतला.

संवादादरम्यान गॅब्रिएल यांनी आठवण सांगितली, “मी 5-6 वर्षांपूर्वी पटकथा लिहित होतो आणि ब्राझीलच्या कोणत्या प्रदेशात चित्रीकरण करावे याबद्दल मी साशंक होतो. आणि नंतर मी गोव्याला भेट दिली आणि मला असे वाटले की मी अमेझॉन प्रदेशात चित्रीकरण करावे; कारण ते गोव्यासारखेच आहे.” ते पुढे म्हणले, “मी गोवा पोलिसांच्या शैलीने थोडा प्रेरित झालो होतो.”
साउंड डिझायनर मारिया अलेजांड्रा रोजास म्हणाल्या, “चित्रपटाची ध्वनी रचना कशी असावी याबद्दल गॅब्रिएल अगदी स्पष्ट होते. एक दिग्दर्शक ध्वनीबद्दल इतका संवेदनशील असणे ही खूपच असामान्य बाब आहे.”

अभिनेत्री रोझा मालागुएटा म्हणाली, “मी अमेझॉन संस्कृतीतून आले आहे. अमेझॉन संस्कृती ही स्वदेशी आहे, अगदी ब्राझिलियन आहे. मी दोन संस्कृतींचे मिश्रण आहे - स्वदेशी आणि अश्वेत संस्कृती. मी चित्रपटात माझ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत आहे.” अभिनेत्री क्लॅरिसा पिनहेरो यांनी देखील अधोरेखित केले की गॅब्रिएलसोबत काम करणे तिच्यासाठी खरोखरच आनंददायी अनुभव होता जो तिचा मित्र होता आणि ज्याचे ती खरोखर कौतुक करते.
‘द ब्लू ट्रेल’च्या प्रीमियरचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. जीवनातील परीक्षांचा मनापासून घेतलेला शोध, लवचिकतेचा शांत उत्सव आणि तेरेसाने इतक्या धाडसाने केलेल्या आत्म-शोधाच्या तेजस्वी प्रवासाबद्दल प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले.
चित्रपटाचा ट्रेलर:
पत्रकार परिषद पाहण्यासाठी:
अधिक वाचण्यासाठी: https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2192321
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2192772
| Visitor Counter:
9