पंतप्रधान कार्यालय
बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
20 NOV 2025 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांचे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.नीतीश कुमार हे अनेक वर्षांपासून सुशासनाचा सिद्ध अनुभव असलेले एक अनुभवी प्रशासक आहेत असे सांगून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनाही बिहारचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.या दोन्ही नेत्यांनी जनतेची सेवा करताना स्थानिक पातळीवर व्यापक काम केले आहे असे नमूद करत त्यांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मोदी यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. समर्पित नेतृत्वासह बिहारला नव्या उंचीवर नेणारा हा संघ आहे, असे म्हणत मोदी यांनी उज्ज्वल यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
एक्स या समाज माध्यमांवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
“नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ते एक कुशल आणि अनुभवी प्रशासक आहेत. राज्यातील सुशासनाचा त्यांचा उत्कृष्ट इतिहास आहे. त्यांच्या नव्या कार्यकाळासाठी त्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@NitishKumar”
“सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे बिहारचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. दोन्ही नेत्यांना तळागाळातील लोकसेवेचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!
@samrat4bjp
@VijayKrSinhaBih”
“बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.समर्पित नेत्यांचा हा एक उत्कृष्ट संघ आहे,जो बिहारला नव्या उंचीवर नेईल.सर्वांना हार्दिक शुभेच्छा"
निलीमा चितळे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192121)
Visitor Counter : 19
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam