iffi banner

गोवा पुढील नऊ दिवस पुन्हा एकदा 'इफ्फी'मय होण्यासाठी सज्ज


इफ्फी 2025 ची सुरुवात ऐतिहासिक भव्य परेडने होणार

उद्याच्या तरुण सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्यापासून ते 'एआय' प्रेरित नवनिर्मिती आणि 'इफ्फीएस्ता' पर्यंत; इफ्फी 25 ठरणार चित्रपट आणि कलाप्रेमींसाठी एक परिपूर्ण गंतव्यस्थान

#IFFIWood, 19 नोव्‍हेंबर 2025

 

गोव्याच्या हवेत 'साउंड ऑफ सिनेमा' चा आवाज पुन्हा घुमत आहे, कारण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या आपल्या 56 व्या आवृत्तीच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला येऊन ठेपला आहे. मागील वर्षांमध्ये प्रस्थापित केलेले 'चोखंदळपणा' आणि सर्वसमावेशकतेचे स्वतःचेच निकष ओलांडण्याच्या दृष्टीकोनातून, इफ्फी 2025 ला एक अविस्मरणीय सिनेमॅटिक सोहळा म्हणून काळजीपूर्वक घडवण्यात आले आहे. ही आवृत्ती आजच्या काळातील कल्पनेतील सर्वोत्तम मनोरंजन अनुभवांची हमी देणारी आहे. असे कार्यक्रम जे समकालीन चमक, सांस्कृतिक समृद्धी आणि भारतीय व जागतिक सिनेमाला परिभाषित करणाऱ्या कथा सांगण्याच्या अमर्याद भावनेने तयार केले गेले आहेत.

यावर्षीच्या इफ्फी ची सुरुवात उद्या एका मंत्रमुग्ध करणाऱ्या 'शुभारंभाच्या परेड'ने होणार आहे. ही परेड गोव्याच्या रस्त्यांना भारताच्या सिनेमॅटिक आत्म्याच्या जिवंत चित्रात रूपांतरित करेल. आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोवा यांचे भव्य चित्ररथ या मिरवणुकीचे नेतृत्व करतील. त्यापाठोपाठ भारताच्या प्रतिष्ठित स्टुडिओंच्या चित्तथरारक कलाकृती आणि एनएफडीसी ची 50 वर्षांची भावपूर्ण मानवंदना असेल. शंभर लोककलाकारांसह "भारत एक सूर," देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील नृत्यांना एकाच लयीत गुंफेल. उत्साह आणि नॉस्टॅल्जियाची भर घालत, छोटा भीम, चुटकी, मोटू पतलू आणि बिट्टू बहानेबाज गर्दीला मोहित करतील. उद्या, इफ्फी ची सुरुवात रंग आणि कल्पकतेची एक जिवंत कविता म्हणून समोर येऊन होईल.

ही परेड गोव्यातून मार्गक्रमण करत असताना, ती केवळ महोत्सवाची सुरुवातच दर्शवणार नाही तर कलात्मक जागृतीचा क्षण घोषित करेल. प्रत्येक चित्ररथ आपापल्या प्रदेशाच्या गाभ्याचं दर्शन घडवेल. प्रत्येक सादरीकरण तिथल्या लोकांच्या हृदयाच्या ठोक्यातून आलेलं असेल आणि प्रत्येक फ्रेम-प्रेरित निर्मिती भारताच्या गोष्ट सांगण्याच्या कालातीत प्रेमाचा पडसाद असेल. समुद्राच्या वाऱ्याप्रमाणे वाढणारे संगीत आणि स्वप्नवत विश्वाप्रमाणे उलगडणारे रंग यांसह, ही 'शुभारंभ परेड' एका अशा इफ्फी महोत्सवाची हमी देते, जिथे भारताची सर्जनशीलता पूर्वीपेक्षा अधिक उजळून निघेल.

तसेच, या पुष्पगुच्छात 15 स्पर्धात्मक आणि विशेष जोड-विभागांचा समावेश आहे. यामध्‍ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सर्वोत्कृष्‍ट दिग्दर्शक -  पदार्पणातील  फीचर फिल्म, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक आणि मॅकाब्रे ड्रीम्स, डॉक्यु-मॉंटेज, प्रायोगिक  चित्रपटे, युनिसेफ आणि ‘रिस्टोअर्ड क्लासिक्स’ असे विशेष विभाग समाविष्ट आहेत. 56 व्या इफ्फी कार्यक्रमात ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’- (सीएमओटी), वेव्हज फिल्म बाजार (19 वी आवृत्ती), द नॉलेज सिरीज, सिनेमा एआय हॅकेथॉन, इफ्फीएस्टा - कल्चरल शोकेस आणि मास्टरक्लासेस,  गट आणि संवादात्मक  कार्यक्रमांचा  समावेश आहे.

  • क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी): 799 प्रवेश नोंदणी मधून, 124 तरूण निर्मात्‍यांची निवड 13 चित्रनिर्मिती कलाकृतींची  निवड करण्यात आली आहे. 56 व्या इफ्फी गोवा येथे ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ चा भाग म्हणून वेव्हज 2025 मधील  ‘सीआयसी चॅलेंज’मधील 24 ‘वाइल्डकार्ड’  विजेत्यांचा समावेश आहे.
  • वेव्हज फिल्म बाजार (19 वी आवृत्ती): भारतातील प्रमुख चित्रपट बाजारपेठेचे  विशेष गोष्‍टींसह पुनरागमन :
    • पटकथालेखक प्रयोग शाळा, मार्केट स्क्रीनिंग्ज, ‘व्ह्यूइंग रूम’ आणि सह-निर्मिती बाजारपेठांमध्ये 300 पेक्षाही जास्त चित्रपटांचे प्रदर्शन
    • सह-निर्मिती बाजारपेठेत 22 फीचर फिल्म्स आणि 5 माहितीपट
    • एकूण 20,000 अमेरिकन डॉलर्स रोख अनुदान
    • वेव्हज फिल्म बाजार शिफारस (डब्ल्यूएफबीआर): विविध स्वरूपांमध्ये 22 निवडक चित्रपट
    • सातपेक्षाही जास्त देशांमधील प्रतिनिधी मंडळे आणि 10 पेक्षाही जास्‍त भारतीय राज्यांमधील चित्रपट प्रोत्साहन प्रदर्शन
    • अत्याधुनिक व्‍हीएफएक्स, सीजीआय अॅनिमेशन आणि डिजिटल निर्मिती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त एक समर्पित दालन.
  • सिनेमएआय हॅकेथॉन: इफ्फी  2025 मध्ये एक नवीन उपक्रम, ‘सिनेमएआय हॅकेथॉन, एलटीआयमाइंडट्री आणि व्हेवज् फिल्म बझार’ यांच्या सहकार्याने आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम प्रज्ञा-चालित नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणारा आहे. चित्रपट तंत्रज्ञानाचा विकास, प्रमाणन प्रक्रिया सुलभ करणे आणि ‘पायरसी’ विरोधी चौकट मजबूत करण्यासाठी इफ्फीची  वचनबद्धता बळकट करणे.
  • इफ्फीएस्टा  – सांस्कृतिक प्रदर्शन: संगीत, सादरीकरण आणि सर्जनशील कलांचा चार दिवसांचा उत्सव इफ्फीएस्टा भरविण्यात येणार आहे. हा उत्सव  21 ते 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 6 ते 8 या कालावधीत श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम थेट सांस्कृतिक अनुभवांद्वारे कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणून भारताच्या चैतन्यशील,  सर्जनशील अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकेल.

इफ्फीच्या या आवृत्तीमध्‍ये  गुरुदत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यांच्यासह दिग्गज चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या शताब्दी वर्षानिमित्त  त्यांना  श्रद्धांजली अर्पण करण्‍यात येणार आहे. सलील चौधरी यांचा मुसाफिर आणि ऋत्विक घटक यांचा सुवर्णरेखा हे चित्रपट इफ्फी 2025 मध्ये दाखवले जातील. यावर्षी, दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्त समारोप समारंभात रजनीकांत यांना सन्मानित करण्‍यात येणार आहे.

सर्व उपक्रम आणि नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, आणि सर्व पातळ्यांवर चोवीस तास सुरु असलेल्या अथक प्रयत्नांचा एका सुंदर वाद्यमेळ्याप्रमाणे प्रत्यय यावा, यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांनी गोव्यातील पणजी येथे इफ्फी महोत्सवाच्या कार्यक्रम स्थळांना भेट देऊन एकूण तयारीचा आढावा घेतला.

या सर्व गोष्टींचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा तर, 'पुढील नऊ दिवस होणार्‍या 'इफ्फी' महोत्सवासाठी गोवा पुन्हा एकदा सुसज्ज झाले आहे.'

 

इफ्फीविषयी

1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव ‘जागतिक सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ म्हणून प्रस्थापित झाला आहे, जिथे पुनर्संचयित क्लासिक्स धाडसी प्रयोगांना सामोरे जातात, आणि सिनेमातील दिग्गज आणि निर्भय, नवागत चित्रकर्मी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. इफ्फी ला खऱ्या अर्थाने झळाळी देणारी गोष्ट म्हणजे, विविध कार्यक्रमांचे अद्भुत मिश्रण- इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, सन्मान आणि ऊर्जामय वेव्हज फिल्म बझार, जिथे कल्पना, सौदे आणि सहयोग एकत्रितपणे भरारी घेतात.

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सागरी किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या 56 व्या इफ्फी महोत्सवात, भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाज, याचा  चमकदार मेळ पाहायला मिळेल, आणि जागतिक मंचावर भारताच्या सर्जनशील प्रतिभेचा हा अविस्मरणीय सोहळा असेल.

अधिक माहितीसाठी, पुढील लिंकवर क्लिक करा:

इफ्फीचे संकेतस्थळ: https://www.iffigoa.org/

पत्र सूचना कार्यालयाची इफ्फी मायक्रोसाइट: https://www.pib.gov.in/iffi/56new/

पीआयबी IFFIWood ब्रॉडकास्ट चॅनल: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/निखिलेश चित्रे/सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2191824   |   Visitor Counter: 32

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia