पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नवी दिल्लीत सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानातील काही कथने केली सामायिक
Posted On:
18 NOV 2025 11:00AM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानातील काही कथने सामायिक केली आहेत.
एका स्वतंत्र, वेगळ्या पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिले आहे;
"रामनाथ गोएंकाजींसाठी नेहमीच राष्ट्र सर्वप्रथम होते. जे काही बरोबर आणि सत्य असेल त्याच्या बाजूनेच ते उभे राहिले. त्यांनी कर्तव्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ स्थान दिले."
जेव्हा अधिकाधिक लोक सहभागी होतात तेव्हा लोकशाही जास्त मजबूत होते.अलिकडच्या बिहार निवडणुकीत विक्रमी मतदान झाले, जे महिलांच्या अधिक मतदानामुळे अधिक खास बनले.
"भारताच्या विकास मॉडेलकडे जगासाठी आशेचे मॉडेल म्हणून पाहिले जाते."
"निवडणुका जिंकण्यासाठी 24/7 निवडणुकीच्या विचारांमध्येच असण्याची गरज नाही. त्यासाठी 'भावनिकदृष्ट्या विचार करण्याची आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची आवश्यकता असते.”
"माओवादाचा प्रभाव कमी होत चालला आहे आणि हे भारताच्या विकासासाठी खूप चांगले आहे."
"चला, आपण एकत्रितपणे वसाहतवादी मानसिकतेपासून स्वतःला मुक्त करण्याचा संकल्प करूया जी केवळ गुलामगिरीची मानसिकता होती.”
"पुढील 10 वर्षांत गुलामगिरीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्त व्हावे असे माझे देशवासीयांना विशेष आवाहन आहे…"
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191089)
Visitor Counter : 7
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam