पंतप्रधान कार्यालय
मदिना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
17 NOV 2025 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रति तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी नमूद केले की, रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास बाधित व्यक्तींना सर्वतोपरी मदत करत आहेत. आवश्यक ते सहकार्य आणि समन्वय सुनिश्चित करण्यासाठी भारतीय अधिकारी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190825)
Visitor Counter : 9