वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत–कॅनडा संयुक्त निवेदन : व्यापार व गुंतवणुकीवरील मंत्रिस्तरीय संवाद - 2025
Posted On:
14 NOV 2025 9:22AM by PIB Mumbai
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या आमंत्रणानुसार, कॅनडाचे निर्यात प्रोत्साहन , आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक विकास मंत्री मनिंदर सिधू यांनी 11 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान भारताचा अधिकृत दौरा केला. कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी- 7 बैठकीच्या निमित्ताने भारत आणि कॅनडाच्या पंतप्रधानांमधील द्विपक्षीय चर्चा तसेच 13 ऑक्टोबर 2025 रोजी “अधिक मजबूत भागीदारीकडे” या परराष्ट्र मंत्र्यांचे संयुक्त निवेदनात व्यापाराला द्विपक्षीय आर्थिक वाढ आणि लवचिकतेचा कणा म्हणून अधोरेखित करण्यात आले . त्यानंतर दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांनी व्यापार व गुंतवणूक विषयक मंत्रीस्तरीय संवादाच्या सातव्या बैठकीचे आयोजन केले.
उभय मंत्र्यांनी भारत–कॅनडा आर्थिक भागीदारीची दृढता आणि सातत्य पुनर्स्थापित करत दीर्घकालीन संवाद, परस्पर आदर आणि भविष्याभिमुख उपक्रमांद्वारे द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याप्रति बांधिलकी व्यक्त केली. मंत्र्यांनी वस्तू व सेवांतील द्विपक्षीय व्यापारात झालेली लक्षणीय वाढ अधोरेखित केली, जी 2024 मध्ये 23.66 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. यापैकी वाणिज्य व्यापार मूल्य सुमारे 8.98 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके असून, मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मंत्र्यांनी भारत–कॅनडा आर्थिक भागीदारीची क्षमता आणि लवचिकता पुनरुज्जीवित केली आणि व्यापार-व गुंतवणुकीच्या नव्या संधी उघडण्यासाठी खासगी क्षेत्राशी सातत्यपूर्ण संवाद राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
दोन्ही पक्षांनी द्विपक्षीय गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण वाढीचे स्वागत केले, ज्यात भारतातील कॅनडाच्या संस्थात्मक गुंतवणुकीचे आणि कॅनडामध्ये भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचे उल्लेख केले गेले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये हजारो रोजगार निर्माण झाले आहेत. मंत्र्यांनी गुंतवणुकीसाठी खुले, पारदर्शक आणि पूर्वानुमानयोग्य वातावरण राखण्याचे तसेच प्राधान्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या संधी शोधण्याप्रति बांधिलकी व्यक्त केली.
मंत्र्यांनी भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये शाश्वत वाढ आणि नवोन्मेषाला चालना देणाऱ्या धोरणात्मक क्षेत्रांतील पूरकता ध्यानात घेऊन व्यापारासाठी उपलब्ध नव्या संधींचाही उल्लेख केला. या क्षेत्रांमध्ये पुढील प्रगतीसाठी दोन्ही बाजूंच्या संबंधित भागधारकांमध्ये क्षेत्र-विशिष्ट संवाद आवश्यक असल्याचे नमूद करून, मंत्र्यांनी पुढीलप्रमाणे सहमती दर्शवली:
ऊर्जा संक्रमण आणि नवीन औद्योगिक विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या खनिजे आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन पुरवठा साखळी भागीदारी प्रोत्साहित करणे.
विमान वाहतूक क्षेत्राच्या आणि दुहेरी वापराच्या क्षमता भागीदारीतील व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी ओळखणे आणि विस्तार करणे, ज्यामध्ये भारतातील कॅनडाच्या विद्यमान उपस्थितीचा आणि भारताच्या विमानवाहतूक क्षेत्रातील वाढीचा लाभ घेणे.
पुरवठा साखळी लवचिकतेचे महत्त्व ओळखून मंत्र्यांनी जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली आणि अलीकडील अडचणींमधून मिळालेल्या धड्यांवर चिंतन केले. त्यांनी कृषीसह महत्त्वाच्या क्षेत्रांतील पुरवठा साखळी दृढ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच विविधीकरण केलेल्या आणि विश्वासार्ह पुरवठा स्रोतांचे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी असलेले योगदान अधोरेखित केले.
मंत्र्यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्याच्या बळकटीसंदर्भात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि जागतिक घडामोडी व विकसित होत असलेल्या व्यापार प्रवृत्तींना अनुसरून आर्थिक भागीदारी उंचावण्याची एकत्रित बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी द्विपक्षीय संवादाला गती देण्याचे आणि लोकांमधील संबंधांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जे या भागीदारीचे बळकट अधिष्ठान आहे.
दोन्ही देशांच्या व्यापार व गुंतवणूक समुदायासोबत पुढील वर्षाच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण मंत्रीस्तरीय संवाद राखण्याचे मंत्र्यांनी ठरवले. त्यांनी पुढील पावले विचारात घेताना घनिष्ठ संपर्क राखण्याचे ठरवून, नवी दिल्लीतील लाभदायी आणि भविष्याभिमुख चर्चेचा सकारात्मक शेवट केला.
***
SushamaKane/RajDalekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189907)
Visitor Counter : 7