पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयाला दिली भेट, स्फोटातील पीडितांचीही घेतली भेट
या कटामागील सूत्रधारांना कठोर शासन केले जाईल, अशी पंतप्रधानांची ग्वाही
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2025 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात जाऊन, अलिकडेच दिल्ली इथे झालेल्या स्फोटातील जखमींची भेट घेतली. त्यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला, त्यांच्या उपचारांबद्दल विचारपूस केली आणि ते लवकर पूर्ण बरे होवोत यासाठी प्रार्थनाही केली.
या घटनेबद्दल त्यांनी तीव्र चिंताही व्यक्त केली. न्यायाची सुनिश्चिती करण्याप्रति सरकारची वचनबद्धताही त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. या कटाच्या सूत्रधारांना कठोर शासन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या संदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश :
"लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात जाऊन दिल्लीतील स्फोटात जखमी झालेल्यांना भेटलो. प्रत्येकजण लवकर बरा व्हावा हीच प्रार्थना.
या कटामागील सूत्रधारांना न्यायाच्या कक्षेत आणले जाईल!
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2189306)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam