गृह मंत्रालय
दिल्ली कार स्फोटाच्या घटनेसंदर्भात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठका
प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेतला जाईल: अमित शाह
Posted On:
11 NOV 2025 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2025
दिल्लीत काल झालेल्या कार स्फोटाच्या घटनेसंदर्भात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे सुरक्षा यंत्रणा आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. या बैठकांमध्ये सुरक्षा विषयक आढावा घेतला गेला.
यांपैकी पहिल्या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तर दुसऱ्या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, एनएसजी अर्थात नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक, न्यायवैद्यकशास्त्र सेवा विभागाचे संचालक, दिल्लीमधील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेचे मुख्य संचालक, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकांनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे:
* * *
सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188984)
Visitor Counter : 10