पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कवी आणि विचारवंत आंदे श्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
Posted On:
10 NOV 2025 3:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात कवी आणि विचारवंत आंदे श्री यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आंदे श्री यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या विचारांमधून तेलंगणाच्या हृदयाचे प्रतिबिंब झळकते. एक प्रगल्भ कवी आणि विचारवंत म्हणून त्यांनी जनतेचा आवाज बनून त्यांच्या संघर्ष, आकांक्षा आणि अदम्य जिद्दीला शब्दबद्ध केले. त्यांच्या शब्दांत अंतःकरण हलवण्याचे, लोकांना एकत्र आणण्याचे आणि समाजाच्या सामूहिक स्पंदनांना आकार देण्याचे सामर्थ्य होते. त्यांनी सामाजिक जाणीव आणि काव्यात्मक सौंदर्य यांचा साधलेला मिलाप केवळ अवर्णनीय आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
आंदे श्री यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांमधून तेलंगणाच्या हृदयाचे प्रतिबिंब झळकते. एक प्रगल्भ कवी आणि विचारवंत म्हणून त्यांनी जनतेचा आवाज बनून त्यांच्या संघर्ष, आकांक्षा आणि अदम्य जिद्दीला शब्दबद्ध केले. त्यांच्या शब्दांत अंतःकरण हलवण्याचे , लोकांना एकत्र आणण्याचे आणि समाजाच्या सामूहिक स्पंदनांना आकार देण्याचे सामर्थ्य होते. त्यांनी साधलेला सामाजिक जाणीव आणि काव्यात्मक सौंदर्य यांचा मिलाप केवळ अवर्णनीय आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांती.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188400)
Visitor Counter : 16
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam