पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आपले राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' हे आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी आणि पुनरुत्थानशील विकसित भारत 2047 च्या आपल्या दृष्टिकोनाला कसे प्रेरणा देत आहे यावरील एक लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2025 2:54PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचे शाश्वत गीत असलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतावरील केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा एक लेख सामायिक केला. “वंदे मातरम हे आपल्या आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी आणि पुनरुत्थानशील विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाला प्रेरणा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांना X वर प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले: “वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, केंद्रीय मंत्री @AmitShah यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे शाश्वत गीत, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या भारताच्या राष्ट्रीय गीताबद्दल लिहिले आहे. वसाहतवादी राजवटीच्या अंधःकारमय काळात लिहिलेले हे गीत सांस्कृतिक अभिमान आणि
संस्कृती आधारित राष्ट्रवाद याचा मेळ साधत, जागृतीचे प्रभात गीत कसे बनले याचे स्मरण त्यांनी करून दिले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, वंदे मातरम हे गीत आपल्या आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी आणि पुनरुत्थानशील विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाला प्रेरणा देत आहे. लेख जरूर वाचा.”
***
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2187459)
आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam