माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्वच्छता मोहीम आणि प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम 5.0 यशस्वीरित्या पूर्ण केली
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विशेष मोहीम 5.0 अंतर्गत मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांची केली पाहणी आणि घेतला आढावा
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विशेष मोहीम 5.0 अंतर्गत 2.6 लाख किलोपेक्षा अधिक भंगाराची विल्हेवाट लावली आणि 77,000 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी केली
Posted On:
04 NOV 2025 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छता तसेच प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम 5.0 यशस्वीरित्या पार पाडली आहे.स्वच्छता स्थापित करणे, कार्यालयीन परिसराचे सौंदर्यीकरण करणे आणि निर्णय घेण्यामध्ये कार्यक्षमता वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
विशेष मोहीम 5.0 च्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- बाहेरील परिसरात हाती घेण्यात आलेली मोहिमांची संख्या आणि स्वच्छ केलेली ठिकाणे अनुक्रमे 1272 आणि 2073 आहेत.
- विल्हेवाट लावलेल्या भंगाराचे प्रमाण 2,62,391 किलो आहे ज्यामध्ये 40,381 किलो ई-कचरा होता ज्यामुळे 1.37 कोटी रुपये महसूल निर्माण झाला आणि 77, 348 चौरस फूट जागा मोकळी झाली. एकूण 174 वाहने वापरासाठी अयोग्य ठरवण्यात आली.
- विक्रमी व्यवस्थापन अंतर्गत, 35,281 फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले ज्यापैकी 11,389 फायली नष्ट करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, 1,486 ई-फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले ज्यापैकी 289 बंद करण्यात आल्या.
- मोहिमेदरम्यान एकूण 489 सार्वजनिक तक्रारी, 121 पीजी अपील, 19 एमपी संदर्भ, 2 राज्य सरकार संदर्भ आणि 2 पीएमओ संदर्भ निकाली काढण्यात आले.
स्वच्छतेचा संदेश पसरविण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सार्वजनिक सहभागासाठी मोहिमेची प्रसिद्धी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाद्वारे करण्यात आली.
मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सचिव संजय जाजू यांनी दर आठवड्याला नियमितपणे घेतला. मंत्रालयाचे नोडल अधिकारी आर.के. जेना, वरिष्ठ आर्थिक सल्लागार यांनी प्रत्येक मीडिया युनिटच्या सर्व नोडल अधिकाऱ्यांसह दररोज प्रगतीबाबत माहिती घेतली . माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मंत्रालयाच्या कार्यालयांची पाहणी केली आणि अधिक सुधारणांसाठी निर्देश दिले.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186496)
Visitor Counter : 8