पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधानांनी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                02 NOV 2025 10:10PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली.
पंतप्रधान म्हणाले की तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना करणे हा अत्यंत दिव्य अनुभव होता. शीख गुरूंच्या उदात्त शिकवणींनी संपूर्ण मानवजातीला प्रेरणा दिली आहे.
ज्यांचे धैर्य आणि न्यायाप्रती बांधिलकी अत्यंत प्रेरणादायक आहे अशा श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्याशी या गुरुद्वाराचा खूप जवळचा संबंध आहे याची देखील मोदी यांनी नोंद घेतली.
पंतप्रधानांनी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब परिसरातील काही छायाचित्रे देखील सामायिक केली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“आज संध्याकाळी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे केलेली प्रार्थना हा एक अत्यंत दिव्य अनुभव होता. शीख गुरूंच्या उदात्त शिकवणी संपूर्ण मानवजातीला प्रेरणा देत आल्या आहेत. ज्यांचे धैर्य आणि न्यायाप्रती बांधिलकी अत्यंत प्रेरणादायक आहे अशा श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्याशी या गुरुद्वाराचा खूप जवळचा संबंध आहे.”
 
“ही पहा तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब परिसरातील काही छायाचित्रे.”
 
“तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे पवित्र जोरे साहिब आणि माता साहिब कौरजी यांचे दर्शन घेतले. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांचा सहभाग असलेल्या दिव्य गुरु चरण यात्रेनंतर ते पाटणा येथे आले. सर्वांनी पाटणा येथे येऊन त्यांचे दर्शन घ्यावे असा माझा आग्रह आहे.”
 
 
 
 
***
JaydeviPujariSwami/SanjanaChitnis/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2185768)
                Visitor Counter : 5
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam