पंतप्रधान कार्यालय
तीन कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2024 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024
आरोग्यसेवा, कृषी आणि शाश्वत शहरे यावर भर असलेल्या तीन कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.
यासंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या संदेशावर पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद:
तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राचे नेतृत्व करणारा देशा म्हणून स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात भारताने महत्वाचे पाऊल टाकले. मला विश्वास आहे की ही उत्कृष्टता केंद्रांचा आपल्या युवा शक्तीला लाभ होईल आणि ती भारताला भविष्यवेधी विकासाचे केंद्र बनवण्यात योगदान देतील.
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184556)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam