पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्तीची सूची: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकृत रशिया दौरा

Posted On: 09 JUL 2024 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2024

 

अनुक्रमांक

सामंजस्य करारांची/करारांची नावे

उद्दिष्टे

1.

वर्ष 2024-2029 या कालावधीत रशियाच्या अतिदूर पूर्व भागातील व्यापारी, आर्थिक आणि गुंतवणुक क्षेत्रात भारत-रशिया सहकार्य तसेच रशियन संघराज्यातील आर्क्टिक प्रदेशात सहकार्य संबंधी तत्त्वांबाबत कार्यक्रम

रशियाचा अतिदूर पूर्व भाग आणि भारत यांच्यातील व्यापार तसेच संयुक्त गुंतवणूक प्रकल्पांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी सुलभता निर्माण करणे

2.

हवामान बदल आणि कमी कार्बन विकासविषयक मुद्द्यांबाबत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचा रशियाच्या आर्थिक विकास मंत्रालयाशी सामंजस्य करार

हवामान बदल आणि कमी कार्बन विकासविषयक मुद्द्यांबाबत संयुक्त कृतिगटाची स्थापना.

माहिती/ सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण तसेच कमी खर्चिक तंत्रज्ञाने विकसित करण्यासाठी संशोधनाचे सह-आयोजकत्व

3.

भारतीय सर्वेक्षण विभाग आणि रशियाचा नोंदणी, कॅडस्ट्रे आणि कार्टोग्राफी विभाग यांच्यात सामंजस्य करार

भूमापनशास्त्र, नकाशाशास्त्र आणि अवकाशीय माहिती विषयक पायाभूत सुविधांमधील माहिती तसेच अनुभवांची देवाणघेवाण; व्यावसायिक प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती; वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य.

4.

केंद्रीय ध्रुवीय तसेच महासागरी संशोधनासाठीचे राष्ट्रीय केंद्र आणि ध्रुवीय प्रदेशांत संशोधन तसेच लॉजिस्टिक्समधील सहकार्याबाबतची आर्क्टिक आणि अंटार्क्टिक संशोधन संस्था यांच्या दरम्यान सामंजस्य करार.

स्त्रोत आणि डाटा सामायिक करून ध्रुवीय वातावरणे आणि त्यांच्यातील वैविध्याच्या अभ्यासात सहकार्य; ध्रुवीय प्रदेशातील लॉजिस्टिक्स; संयुक्त संशोधने; कर्मचाऱ्यांचे आदानप्रदान; तसेच ध्रुवीय प्रदेशातील आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि प्रकल्पांमध्ये सहभाग.

5.

भारतातील प्रसारभारती आणि रशियाचे एएनओ “टीव्ही-नोव्होस्ती” (रशिया टुडे ही टीव्ही वाहिनी) यांच्या दरम्यान प्रसारण विषयक सहकार्य आणि सहयोगाबाबत सामंजस्य करार.

कार्यक्रम, कर्मचारी आणि प्रशिक्षण यांच्या देवाणघेवाणीसह प्रसारणाच्या क्षेत्रात सहकार्य.

6.

भारताच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील भारतीय फार्माकोपिया आयोग आणि रशियाच्या आरोग्य मंत्रालयातील “औषधी उत्पादनांच्या तज्ञ मूल्यमापनासाठीचे वैज्ञानिक केंद्र” ही बजेटरी संस्था यांच्यादरम्यान सामंजस्य करार.

माहितीची देवाणघेवाण तसेच क्षमता निर्मिती यांच्या माध्यमातून मानवी वापरासाठी उत्तम दर्जाच्या औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे.

7.

भारतीय आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि रशियाच्या वाणिज्य आणि उद्योग चेंबरमधील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद न्यायालय यांच्या दरम्यान सहकार्य करार.

व्यावसायिक स्वरूपाच्या नागरी कायदाविषयक विवादांच्या निराकरणात सुलभता.

8.

इन्व्हेस्ट इंडिया आणि जेएससी ही “रशियाच्या थेट गुंतवणूक निधीची व्यवस्थापन कंपनी” यांच्यादरम्यान संयुक्त गुंतवणूक प्रोत्साहन आराखडा करार

गुंतवणूक विषयक सहकार्याला चालना आणि उत्तेजन देऊन भारतीय बाजारपेठेत रशियाच्या कंपन्यांतर्फे गुंतवणूकीत सुलभता

9.

भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळ आणि “बिझनेस रशिया” या अखिल रशिया सरकारी संस्थेदरम्यान सामंजस्य करार

द्विपक्षीय करार आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन, बी2बी (दोन व्यवसायांदरम्यानच्या) बैठकींचे तसेच व्यापार प्रोत्साहनविषयक कार्यक्रमांचे आयोजन; आणि व्यापारी प्रतिनिधीमंडळांचे आदानप्रदान

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183889) Visitor Counter : 5