पंतप्रधान कार्यालय
ओलिसांच्या मुक्ततेचे पंतप्रधानांकडून स्वागत, गाझा भागातील शांततेसाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांप्रती व्यक्त केला पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
13 OCT 2025 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025
दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ओलिस ठेवलेल्या सर्वांच्या मुक्ततेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ओलिसांची मुक्तता ही त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निर्धार याचा परिपाक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
गाझा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या कळकळीच्या प्रयत्नांना मोदी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
'एक्स' माध्यमावरील संदेशात मोदी म्हणतात,
"दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ओलिस राहिलेल्या सर्वांच्या सुटकेचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष ट्रम्प यांनी शांततेसाठी निर्धारपूर्वक केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा दृढ निर्धार यांचा परिपाक आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे."
@POTUS
@realDonaldTrump
@netanyahu”
निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178707)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam