शिक्षण मंत्रालय
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लाईव्ह स्कूल इनोव्हेशन चॅलेंजमध्ये 3 लाखांहून अधिक शाळांचा सहभाग हा ऐतिहासिक क्षण
देशातील सर्वात मोठ्या शालेय नवोन्मेष चळवळीचे- विकसित भारत बिल्डॅथॉन 2025 चे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
विकसित आणि समृद्ध भारताची धुरा आमचे प्रतिभावान शालेय विद्यार्थी सांभाळतील - धर्मेंद्र प्रधान
Posted On:
13 OCT 2025 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे विकसित भारत बिल्डथॉन (व्हीबीबी) 2025 चे उद्घाटन केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात मोठे समन्वित नवोन्मेष हॅकेथॉन असलेल्या विकसित भारत बिल्डथॉन 2025 मध्ये एकाच वेळी 3 लाखांहून अधिक शाळांनी भाग घेतला. उद्घाटन सत्रादरम्यान, मंत्र्यांनी ओडिशातील भुवनेश्वर येथील खोर्दा येथील पीएम श्री सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आपल्या भाषणादरम्यान प्रधान यांनी या भव्य शालेय नवोन्मेष उपक्रमात उत्साही सहभागाबद्दल भारतातील 3 लाखांहून अधिक शाळा आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. येथून उदयास आलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना नवीन जागतिक मॉडेल तयार करण्याचा आणि देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्याचा मार्ग प्रशस्त करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले प्रतिभावान शालेय विद्यार्थी विकसित आणि समृद्ध भारताची धुरा सांभाळतील असे मंत्र्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न व्हीबीबीसारख्या परिवर्तनकारी प्रयत्नांद्वारे साकार होईल यावर त्यांनी भर दिला आणि देशाचे भविष्य घडवण्यात विद्यार्थ्यांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार म्हणाले की अशाप्रकारची चळवळ अध्ययन क्षमता वाढवून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाला बळकटी देईल. कुमार यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले.
अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक दीपक बागला यांनी व्हीबीबीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की बिल्डॅथॉन अभिनवतेला एक लोकचळवळ बनवेल, ज्यामुळे दुर्गम गावांमधील शाळा गजबजलेल्या महानगरांमधील शाळांशी जोडल्या जातील.
प्रधान यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी मथुरा रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूल आणि दिल्ली कॅन्टोंमेंटमधील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 ला भेट दिली. प्रधान यांनी विविध नाविन्यपूर्ण विद्यार्थी प्रकल्पांचे निरीक्षण केले आणि त्यांच्या शिक्षण प्रक्रियेबद्दल माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि उत्साहाला दाद देऊन, त्यांना जिज्ञासू राहण्यास प्रोत्साहित केले आणि आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाकडे सक्रियपणे योगदान देणाऱ्या त्यांच्या विलक्षण सर्जनशीलतेची प्रशंसा केली.


उद्घाटन सत्रानंतर 120 मिनिटांचे लाईव्ह इनोव्हेशन चॅलेंज सादर करण्यात आले. दोन तासाच्या या लाईव्ह टिंकरिंग सत्रात 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, ज्यामध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी 3-5 जणांच्या संघात काम करून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल आणि समृद्धी या चार संकल्पनांवर विचार मांडून प्रारूप तयार केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे स्कूल स्पॉटलाइट्स, जिथे दुर्गम प्रदेश, आकांक्षी जिल्हे, डोंगराळ राज्ये आणि सीमावर्ती भागातील 150 हून अधिक शाळा त्यांची प्रगती आणि त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी थेट जोडल्या गेल्या.
नोंदणीकृत शाळांची माहिती (राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार)
1 Andaman and Nicobar Islands 171
2 Andhra Pradesh 3980
3 Arunachal Pradesh 206
4 Assam 15656
5 Bihar 15732
6 Chandigarh 269
7 Chhattisgarh 8363
8 Delhi 4033
9 Goa 194
10 Gujarat 20017
11 Haryana 11567
12 Himachal Pradesh 4575
13 Jammu and Kashmir 4754
14 Jharkhand 9779
15 Karnataka 10248
16 Kerala 4640
17 Ladakh 358
18 Lakshadweep 9
19 Madhya Pradesh 18129
20 Maharashtra 41198
21 Manipur 896
22 Meghalaya 544
23 Mizoram 835
24 Nagaland 926
25 Odisha 12344
26 Puducherry 149
27 Punjab 5725
28 Rajasthan 6310
29 Sikkim 338
30 Tamil Nadu 16370
31 Telangana 2724
32 Dadra & Nagar Haveli and Daman & Diu 235
33 Tripura 2299
34 Uttar Pradesh 78206
35 Uttarakhand 2473
36 West Bengal 1216
निलीमा चितळे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178655)
Visitor Counter : 8