पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून एन.चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्रीपदाची 15 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा

Posted On: 11 OCT 2025 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मुख्यमंत्रीपदाची 15 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी नायडू यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे आणि सुशासनाप्रती असलेल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, राजकारणात इतकी वर्षे उलटूनही त्यांच्या कार्यात विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता हे मुख्य मूल्य राहिले आहे. पंतप्रधानांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या त्यांच्या आणि नायडू यांच्या सहकार्याच्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा दोघेही मुख्यमंत्री होते. त्यांनी जनसेवेसाठी नायडू यांच्या अखंड समर्पणाचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील जनतेच्या प्रगती आणि कल्याणासाठी नायडू यांच्या पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे:

“मी आज चंद्राबाबू नायडू गारू यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्रीपदाची 15 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाने आणि चांगल्या शासनाप्रती बांधिलकीने त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सातत्य राखले आहे. आम्ही दोघेही मुख्यमंत्री असताना 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून अनेक प्रसंगी एकत्र काम केले आहे. आंध्र प्रदेशच्या कल्याणासाठी ते ज्या उत्कटतेने कार्य करत आहेत, त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.

@ncbn”

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2178056) Visitor Counter : 7