रेल्वे मंत्रालय
सुमारे 7,000 प्रवाशांना सामावून घेण्यासाठी तयार केलेल्या, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील नवीन, अत्याधुनिक यात्री सुविधा केंद्राची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी
देशभरातील इतर स्थानकांवरही अशाच प्रकारची यात्री सुविधा केंद्रे विकसित केली जातील: अश्विनी वैष्णव
Posted On:
11 OCT 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
देशातील सर्वात वर्दळीच्या टर्मिनल्सपैकी एक असलेल्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या अनुभवात लक्षणीय वाढ करण्यासाठी, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील (एनडीएलएस) नव्याने बांधलेल्या यात्री सुविधा केंद्राची (कायमस्वरूपी क्षेत्र) पाहणी केली. हे केंद्र कोणत्याही वेळी अंदाजे 7,000 प्रवाशांना सामावून घेण्यासाठी तयार केले आहे. या केंद्रामुळे बोर्डिंगपूर्वी आराम आणि स्थानकावरील गर्दीचे नियोजन यात लक्षणीय वाढ होणार आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले, "नवीन विकसित केलेले अत्याधुनिक यात्री सुविधा केंद्र सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुविधा देईल कारण या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. देशातील इतर स्थानकांवरही अशा प्रकारची यात्री सुविधा केंद्रे विकसित केले जातील."
प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उत्तर रेल्वेने केंद्राला व्यापक, आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:
- तिकीट वितरण: 22 आधुनिक तिकीट काउंटर आणि 25 स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन
- क्षमता आणि आराम: 200 प्रवाशांसाठी बसण्याची क्षमता आणि वातानुकूलित अनुभवासाठी/ परिसर हवेशीर राहण्यासाठी 18 हाय व्हॉल्यूम लो स्पीड (HVLS) पंखे.
- स्वच्छता आणि पाणी: 652 चौरस मीटरवर बांधलेला समर्पित शौचालय ब्लॉक, आरओ-आधारित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
- माहिती आणि सुरक्षितता: 24 स्पीकर्ससह एक मजबूत प्रवासी घोषणा प्रणाली, तीन एलईडी इलेक्ट्रॉनिक ट्रेन माहिती डिस्प्ले आणि आधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या 7 युनिट्स
- सुरक्षा: अत्याधुनिक सुरक्षा उपाय ज्यामध्ये 18 सीसीटीव्ही कॅमेरे, 5 सामान स्कॅनर आणि 5 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यांचा समावेश आहे.
* * *
निलिमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177816)
Visitor Counter : 12