आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

द्रव्य (DRAVYA) पोर्टलवर पहिल्या टप्प्यात 100 आयुष पदार्थांची सूची करणार जारी


द्रव्य हे पोर्टल म्हणजे डिजिटल संग्रहासोबतच, भारताच्या ज्ञान परंपरेचे जिवंत प्रतीक : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेद्वार निर्मिती कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारीत द्रव्य पोर्टलमुळे आयुष संबंधी पदार्थांवरील पारंपरिक आणि आधुनिक संशोधनाचे डिजीटलाझेशन आणि एकात्मिकरण घडून येणार, यामुळे विविध आंतर ज्ञानशाखीय नवोन्मेषालाही मिळणार चालना

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2025 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेने द्रव्य (DRAVYA) हे कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारीत पोर्टल तयार केले आहे. पहिल्या टप्प्यात, 100 प्रमुख औषधी पदार्थांची माहिती सूचीबद्ध करणे या यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या माहितीची अचूकता आणि वस्तुनिष्ठता सुनिश्चित करण्यासाठी एका समर्पित एन्ट्री सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोर्टलवर दिली जाणारी माहिती सातत्याने अद्ययावत केली जाणार आहे. द्रव्य अर्थात डीआयजीटाइज्ड रिट्रिव्हल ॲप्लिकेशन फॉर वर्सटाइल यार्डस्टिक ऑफ आयुष (Digitised Retrieval Application for Versatile Yardstick of Ayush - DRAVYA) हा केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेचा (Central Council for Research in Ayurvedic Sciences - CCRAS) एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, हे एक अभिनव ऑनलाइन ज्ञान भांडार असणार आहे.

द्रव्य हे कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारीत पोर्टल असून, ते आयुष ग्रीडसोबत तसेच औषधी पदार्थ आणि औषध धोरणासंबंधीच्या मंत्रालयाच्या इतर उपक्रमांशी परस्पर जोडले जाणार आहे. या व्यासपीठावर क्यूआर कोडचे एकात्मिकरण गेले गेले असून, यामुळे देशभरातील औषधी वनस्पतींच्या बागा आणि औषध भांडारांमध्ये प्रमाणित माहिती प्रदर्शित करणे शक्य होणार आहे.

हे पोर्टल म्हणजे पारंपरिक औषधोपचार क्षेत्रात पुराव्यावर आधारित एकात्मिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. गोव्यात अलिकडेच 23 सप्टेंबर रोजी झालेल्या 10 व्या आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुष मंत्रालयाने या पोर्टलचे अनावरण केले होते. या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष प्रतापराव जाधव आणि केंद्रीय ऊर्जा तसेच नव आणि अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे मान्यवर उपस्थिती होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून आयुष संबंधित औषधी पदार्थांवरील वस्तुनिष्ठ आणि संशोधन आधारित माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याबाबत मंत्रालयाची वचनबद्धताही अधोरेखित झाली आहे.

शास्त्रीय आयुर्वेदिक ग्रंथ आणि मानक ऑनलाइन संशोधनाशी संबंधित डेटा गतिमानपणे एकत्रित करणारे, द्रव्य हे पोर्टल एक व्यापक, मुक्त-प्रवेश देणारे डेटाबेस म्हणून काम करते.अंतर्ज्ञानाचा वापर करणाऱ्या इंटरफेससह डिझाइन केलेले, हे पोर्टल वापरकर्त्यांना आयुष प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधी पदार्थांची माहिती जाणून घेण्यास आणि आयुर्वेदिक औषधनिर्माणशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र आणि सुरक्षितता याविषयीच्या माहितीच्या व्यापक मेन्यूमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करते.

या उपक्रमाबद्दल बोलताना, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, "द्रव्य हे केवळ डिजिटल माहिती संग्रहापेक्षा अधिक ज्ञान देणारे असे हे पोर्टल आहे - ते सद्यकालीन स्वरूपात भारताच्या ज्ञान परंपरेला दिले गेलेले मूर्त स्वरूप आहे. पारंपरिक ज्ञानाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून, आम्ही जागतिक सहकार्य आणि नवोपक्रमासाठी आयुर्वेद आणि इतर आयुष प्रणालींसाठी वैज्ञानिक पाया मजबूत करत आहोत."

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी यावर भर दिला की, “द्रव्य हे आयुष ज्ञानाला वैज्ञानिक काटेकोरपणा आणि जागतिक स्तरावर सुलभ उपयुक्तता डिजिटल युगात आणण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचे उत्तम उदाहरण आहे.समकालीन संशोधनासह शास्त्रीय संदर्भांचे संयोजन करून, हे व्यासपीठ केवळ वैज्ञानिक समुदायाला सक्षम बनवणार नाही तर जगभरातील धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांसाठी एक विश्वासार्ह, तंत्रज्ञान-चालित संसाधन म्हणून देखील काम करेल.”

“हे व्यासपीठ संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी एक आधारस्तंभ असेल,”असे केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेचे (सीसीआरएएसचे) महासंचालक प्रा .रबीनारायण आचार्य यांनी यावेळी सांगितले. “हे आंतर-विद्याशाखीय संशोधन सक्षम करेल, औषधनिर्माणशास्त्रीय सुसंवाद वाढवेल आणि आयुष औषधांचे पुराव्यावर आधारित प्रमाणीकरण वाढवेल,असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

त्याच्या मॉड्यूलर डिझाइन आणि विस्ताराच्या क्षमतेसह, द्राव्य पारंपारिक औषधांच्या विशाल समूहाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनासह एकत्रित आणण्याच्या दिशेने टाकलेले एक परिवर्तनकारी पाऊल आहे - आयुष ज्ञान प्रमाणित, सुलभ, सहज प्राप्त आणि जागतिक स्तरावर अनुकूल बनवण्यासाठी हा एक मैलाचा दगड ठरेल.

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार /संपदा पाटगावकर /प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2176842) आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , Urdu , हिन्दी , English , Gujarati , Malayalam , Tamil , Telugu