पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना 73 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2025 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. पंतप्रधानांनी पुतिन यांचे 73व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच पुढील वाटचालीतील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय कृतीयोजनेतील प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-रशिया विशेष व विशेषाधिकारयुक्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान म्हणाले की,23व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे भारतामध्ये स्वागत करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176007)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam