पंतप्रधान कार्यालय
बंगालच्या उपसागरात येणाऱ्या “रेमल” चक्रीवादळाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला; चक्रीवादाळामुळे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे
पंतप्रधानांनी सांगितले की, भारत सरकारने राज्य सरकारला पूर्ण सहकार्य केले आहे आणि पुढेही करत राहणार
मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आणि अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे; सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये सध्या तैनात असलेल्या एनडीआरएफ पथकासह, पंतप्रधानांनी आणखी पथके एका तासाच्या आत तयार ठेवण्याचे आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत
बांगलादेशला नियमित अपडेटसह माहिती देखील पुरवली जात आहे
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2024 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7 वाजता, लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात येणाऱ्या "रेमल" चक्रीवादळाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीपर्यंत बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर, सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान, मोंगला (बांगलादेश) च्या नैऋत्येला ओलांडण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांना माहिती देण्यात आली की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती, पश्चिम बंगाल सरकारच्या नियमित संपर्कात आहे. सर्व मच्छिमारांना बंगाल उपसागराच्या दक्षिणेकडील भागात आणि अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय हवामान विभाग बांगलादेशला नियमित अपडेट्ससह माहिती देखील देत आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की भारत सरकार, राज्य सरकारला पूर्णपणे मदत करत आहे आणि करत राहणार. गृह मंत्रालयाने चक्रीवादळ आल्यानंतर परिस्थितीचे निरीक्षण करावे आणि त्याचा आढावा घ्यावा जेणेकरून सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मदत करता येईल, असे पंतप्रधान म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये आधीच तैनात असलेल्या १२ एनडीआरएफ पथकांव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी एका तासाच्या आत अधिक पथके तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय तटरक्षक दल त्यांची यंत्रणा तैनात करेल. त्यांनी सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदरे, रेल्वे आणि महामार्गांवर कडक दक्षता ठेवण्यात येत आहे.
आढावा बैठकीत पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, एनडीआरएफचे महासंचालक, आयएमडीचे महासंचालक आणि एनडीएमएचे सदस्य सचिव उपस्थित होते.
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175038)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam