गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला तीव्र शोक
Posted On:
30 SEP 2025 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नवी दिल्ली येथे अमित शाह यांनी दिवंगत नेत्याच्या पार्थिवावर पुष्पांजली अर्पण केली.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की संघटनेला आकार देण्यात आणि त्याचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते तसेच लोकप्रतिनिधी म्हणून, विजय कुमार मल्होत्रा जी यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून देशाची आणि दिल्लीच्या जनतेची सेवा केली.
अमित शाह पुढे म्हणाले की, मल्होत्रांजींच्या सोबत झालेल्या प्रत्येक भेटीत संघटनात्मक बाबींविषयी मौल्यवान माहिती मिळाली. या दुःखाच्या प्रसंगी, संपूर्ण पक्षपरिवार त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे.ओम शांती शांती शांती!

एक्स पोस्टवर अमित शाह म्हणाले,
“विजय कुमार मल्होत्रा जी यांनी केवळ दिल्लीतील पक्षाचे संघटन मजबूत केले असे नव्हे तर विविध जबाबदाऱ्या सांभाळत नेहमीच सार्वजनिक समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले. आज त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
जनसंघापासून जनता पक्ष आणि भाजपापर्यंत संघटनेला आकार देण्यात आणि तिचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले.
* * *
निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173311)
Visitor Counter : 4