युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कारांसाठी मागवले अर्ज

Posted On: 30 SEP 2025 11:17AM by PIB Mumbai

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीला नावाजण्यासाठी आणि त्यांना बक्षीस देण्यासाठी दरवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातोअर्जुन पुरस्कार हे खेळाडूंच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाताततसेच अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) हा क्रीडा विकासातील आजीवन योगदानासाठी दिला जातोद्रोणाचार्य पुरस्कार हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेते निर्माण करणाऱ्या प्रशिक्षकांना दिला जातोत्यासोबतच ज्यांनी देशात क्रीडा प्रचार आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,अशा कॉर्पोरेट संस्था (सार्वजनिक/खाजगी)तसेच गैर-सरकारी संस्था (एनजीओ) यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार (आरकेपीपी)  दिला जातो.या पुरस्कारांच्या योजनेची माहिती देणारी  प्रत मंत्रालयाच्या www.yas.nic.in यासंकेतस्थळावर पाहता येईल.

भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवते. 2025 या वर्षाच्या या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्याच्या सूचना www.yas.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.

.संबंधित पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू/प्रशिक्षक/संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी एका समर्पित पोर्टलद्वारे केवळ ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज मागविण्यात येत आहेत.पुरस्कारातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांनी फक्त www.dbtyas-sports.gov.in या पोर्टलवरूनच ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज भरण्यात काही समस्या आल्यासअर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas[at]gov[dot]in या ईमेलवर तसेच 011-233-87432 या दूरध्वनी क्रमांकांवर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत किंवा टोल फ्री क्रमांक 1800-202-5155, 1800-258-5155 (कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत) संपर्क साधू शकतात.पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू/प्रशिक्षक/संस्थांचे अर्ज www.dbtyas-sports.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रात्री 11:59 वाजेपर्यंत सादर करावेत.

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173012) Visitor Counter : 17