पंतप्रधान कार्यालय
तियानजिन येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
31 AUG 2025 11:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2025
महामहिम,
माझे स्नेहपूर्ण स्वागत केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. गेल्या वर्षी कझानमध्ये आमची खूप अर्थपूर्ण चर्चा झाली, ज्यामुळे आमच्या संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली. सीमेवर सैन्य माघारी घेतल्यानंतर शांतता आणि स्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या विशेष प्रतिनिधींनी सीमा व्यवस्थापनावर एक करार केला आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे देखील पुन्हा सुरू होत आहेत. आमचे सहकार्य दोन्ही देशांमधील 2.8 अब्ज लोकांच्या हितासाठी आहे. यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही मोकळा होईल. परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेवर आधारित आमचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
महामहिम,
चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या यशस्वी अध्यक्षपदाबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. चीनला भेट देण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल आणि आजच्या बैठकीसाठी मी मनापासून आभार मानतो.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170676)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam