गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नक्षलवादाविरोधातील कारवाईत आणखी एक मोठे यश मिळविल्याबद्दल केंद्रिय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून सुरक्षा दलांची प्रशंसा


नक्षलवाद्यांच्या केंद्रिय समितीचे सदस्य असलेले कादरी सत्यनारायण रेड्डी उर्फ कोसा आणि कट्टा रामचंद्र रेड्डी यांना सुरक्षा दलांनी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील नारायणपूर इथल्या अबुझमाद भागात घातले कंठस्नान

दोन्ही नक्षलींवर प्रत्येकी 40 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते

आपली सुरक्षा दले नियोजनबद्ध रितीने नक्षली म्होरक्यांना संपवत आहेत, लाल दहशतवादाचा कणा मोडण्याचे काम करत आहेत

Posted On: 22 SEP 2025 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी आज सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत मिळवलेल्या आणखी एका यशाची प्रशंसा केली आहे.

एक्स माध्यमावरील संदेशात केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, आज आपल्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात आणखी एक मोठा विजय मिळविला. महाराष्ट्र – छ्त्तीसगड सीमेवरील नारायणपूर इथल्या अबुझमाद भागात सुरक्षा दलांनी केंद्रिय समितीचे सदस्य असलेल्या दोन नक्षली नेत्यांना ठार केले. केदारी सत्यनारायण रेड्डी उर्फ कोसा आणि कट्टा रामचंद्र रेड्डी या  ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 40 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आपली सुरक्षा दले नियोजनबद्ध रितीने नक्षलवाद्यांच्या म्होरक्यांना संपवून लाल दहशतवादाचा कणा मोडत आहेत.  

 

 

* * *

सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे


(Release ID: 2169827)