माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालय 2 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विशेष मोहीम 5.0 राबवणार, ज्यामध्ये मुख्य सचिवालय आणि देशभरातील माध्यम युनिट्समध्ये स्वच्छता, कामकाजाची कार्यक्षमता आणि प्रलंबित कामे कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार
माध्यम युनिट्सना उद्दिष्टे निश्चित करणे , प्रलंबित संदर्भ ओळखणे, रेकॉर्ड व्यवस्थापन सुधारणा, जुने साहित्य, ई-कचरा यांची विल्हेवाट लावणे आणि कार्यालये सुशोभित करण्याच्या निर्देशांसह सज्जतेचा टप्पा प्रगतिपथावर
मागील मोहिमांचे मोठे यश: 2021 पासून 33.39 कोटी रुपये महसुलाची निर्मिती, 10.26 लाख किलो भंगाराची विल्हेवाट, 12.9 लाख चौरस फूट जागा मोकळी आणि जवळपास 1.69 लाख जुन्या फाईल्स मोडीत काढण्यात आल्या
Posted On:
19 SEP 2025 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विशेष मोहीम 5.0 सुरू करण्याची तयारी करत आहे. कार्यालयांची स्वच्छता वाढवणे, एकूण कामाचे वातावरण सुधारणे आणि प्रलंबित कामे कमी करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम मुख्य सचिवालय आणि देशभरातील मीडिया युनिट्समध्ये राबवली जाईल.
विशेष मोहीम 5.0 च्या तयारीच्या टप्प्यात, सर्व मीडिया युनिट्सना, त्यांच्या क्षेत्रीय युनिट्ससह, मुख्य सचिवांना उद्दिष्टे निश्चित करण्याचे, प्रलंबित संदर्भ ओळखण्याचे, स्वच्छता आणि जागेचे व्यवस्थापन सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या दस्तावेजांचे व्यवस्थापन, कालबाह्य सामग्री, ई-कचरा यांची विल्हेवाट लावण्यावर आणि कार्यालये सुशोभित करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. सर्व मीडिया युनिट्ससाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, ज्यात मंत्रालयासाठी देखील नोडल अधिकारी आहेत.
12 सप्टेंबर 2025 रोजी, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सर्व मीडिया युनिट्सचे प्रमुख आणि त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत मोहिमेची तयारी आणि अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली आणि या वर्षीच्या मोहिमेसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य आणि वेळेवर कृती करण्याचे निर्देश दिले.
या मंत्रालयाने मागील विशेष मोहिमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे स्वच्छतेचे संस्थात्मकीकरण आणि प्रलंबित प्रकरणांचा वेळेवर निपटारा करण्याची त्यांची सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून येते. पूर्वीच्या मोहिमांमधील प्रयत्नांमुळे केवळ कार्यालयांची स्वच्छताच सुधारली नाही, तर महसूल निर्मिती, जागेचे व्यवस्थापन आणि जुन्या फाईल्सचा निपटारा करण्यातही लक्षणीय यश मिळाले.
2021 मध्ये विशेष मोहिमेच्या सुरुवातीपासून एकूण रु.33.39 कोटी महसूल जमा झाला आहे. 2022 ते 2024 या काळात, सुमारे 10.26 लाख किलोग्राम भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली, 12.9 लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आणि 1.69 लाख जुन्या फाईल्सची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष मोहीम 2.0 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत, एकूण 4948 आऊटडोअर मोहिमा राबवण्यात आल्या आणि 12,605 ठिकाणे स्वच्छ करण्यात आली.
या मोहिमेतील काही महत्त्वाच्या कामगिरी खाली दिल्या आहेत.
YEAR-WISE TOTAL REVENUE GENERATED
& SPACE FREED UNDER SPECIAL CAMPAIGN
|
Year
|
Total Revenue Generated (in ₹)
|
Total Space Freed (in sq. ft.)
|
2021
|
7433500
|
-
|
2022
|
254282632
|
1138993
|
2023
|
53899811
|
63216
|
2024
|
18366429
|
88108
|
|
|
|


YEAR-WISE TOTAL SCRAP DISPOSED & PHYSICAL FILES WEEDED OUT
UNDER SPECIAL CAMPAIGN
|
Year
|
Total Scrap Disposed (in kg)
|
Total Physical Files Weeded Out
|
2021
|
-
|
-
|
2022
|
473545
|
73318
|
2023
|
349126
|
47094
|
2024
|
203765
|
48638
|
|
|
|


YEAR-WISE TOTAL OUTDOOR CAMPAIGNS & SPOTS CLEANED UNDER SPECIAL CAMPAIGN
|
Year
|
Total Outdoor Campaigns
|
Total Spots Cleaned
|
2021
|
-
|
-
|
2022
|
1103
|
3947
|
2023
|
2358
|
4394
|
2024
|
1487
|
4264
|
|
|
|
|
|
|


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168775)