पंतप्रधान कार्यालय
सशस्त्र दलांच्या परिचालन सज्जतेत वाढ होण्याच्या दृष्टीने संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे झालेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेत दिला भर
Posted On:
15 SEP 2025 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांडर्स परिषद -2025 चे उद्घाटन केले. दर दोन वर्षांनी एकदा आयोजित होणारी ही परिषद म्हणजे सशस्त्र दलांचा सर्वोच्च स्तरीय विचारमंथन मंच आहे, जो देशाच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पाया घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या परिषदेची संकल्पना 'सुधारणांचे वर्ष - भविष्यासाठी परिवर्तन' अशी असून ती सध्या सुरु असलेल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि परिवर्तन यावर आधारित आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशासह राष्ट्र उभारणी, चाचेगिरी विरुद्ध मोहिमा, संघर्षग्रस्त भागातून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका आणि मैत्रीपूर्ण राष्ट्रांना आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्य करण्यात सशस्त्र दलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. 2025 हे वर्ष संरक्षण क्षेत्रासाठी परिवर्तनाचे वर्ष असून त्यानुसार संरक्षण मंत्रालयाने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्यासह कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी समर्थ असावे यादृष्टीने संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष यावर विशेष भर द्यावा अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
ऑपरेशन सिंदूरने तयार केलेल्या न्यू नॉर्मल अर्थात नवीन सामान्यतेच्या परिस्थितीच्या संदर्भात सैन्याच्या परिचालन सज्जतेबद्दल तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि रणनीतींच्या संदर्भात भविष्यातील युद्ध याबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या सुधारणांचा तसेच पुढील दोन वर्षांतील योजनांचाही पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला.
पुढील दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध संरचनात्मक, प्रशासनात्मक आणि परिचालनासंदर्भातील गोष्टींविषयी सैन्याकडून मिळालेल्या अभिप्रायावर आधारित समग्र आढावा घेतला जाईल तसेच वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र दलांची सज्जता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पथदर्शी आराखडा तयार करण्याबाबत विचारविनिमय केला जाईल.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166822)
Visitor Counter : 2
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam