गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबादच्या नारनपूरा येथे ₹825 कोटींच्या खर्चाने उभारलेल्या वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन
Posted On:
14 SEP 2025 8:36PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबादच्या नारनपूरा येथे सुमारे ₹825 कोटींच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले.
उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की, वीर सावरकर क्रीडा संकुल हे भारतातील सर्वात मोठे असून जगातील अत्याधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक आहे.
शाह यांनी विश्वास व्यक्त केला की, वीर सावरकर क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेण्यासाठी व स्पर्धेत भाग घेण्यासाठी येणारे खेळाडू केवळ पदक जिंकण्याची प्रेरणा घेणार नाहीत, तर जगभर विजय संपादन करून भारतमातेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रेरित होतील.
ते पुढे म्हणाले की, या क्रीडा संकुलात आणि अहमदाबादमधील इतर क्रीडा सुविधा केंद्रांमध्ये 2029 साली `वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स`चे आयोजन केले जाईल. याशिवाय, भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठीही अर्ज केला आहे आणि लवकरच अहमदाबादला ते आयोजित करण्याची परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे.
तसेच त्यांनी सांगितले की, भारत सरकार 2036 मध्ये अहमदाबादमध्ये ऑलिंपिक आयोजित करण्यासाठी शक्य ती सर्व तयारी करत आहे. शाह यांनी पुढे सांगितले की, 2036 पर्यंत येथे 13 आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे अहमदाबाद केवळ गुजरातचेच नव्हे तर संपूर्ण आशियाई खंडाचे क्रीडा केंद्र बनेल.
***
सुषमा काणे / नितीन गायकवाड / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2166622)
Visitor Counter : 2