दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्सना (डीपीओ) मासिक आणि त्रैमासिक कामगिरी निरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश
Posted On:
10 SEP 2025 11:13AM by PIB Mumbai
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय ) ने आज भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा, 1997 च्या कलम 12 अंतर्गत एक आदेश जारी केला असून त्यामध्ये डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्सना (डीपीओ ), म्हणजे उदा. डीटीएच ऑपरेटर, मल्टी-सिस्टम ऑपरेटर (एमएसओ), हेडएंड-इन-द-स्काय (HITS) ऑपरेटर आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन ऑपरेट्स (आयपीटीव्ही ) यांना त्यांच्या प्रसारण सेवांचे मासिक आणि त्रैमासिक आधारावर कामगिरी देखरेख अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाने यापूर्वी, 24 जुलै 2008 रोजीच्या त्यांच्या आदेशात डायरेक्ट-टू-होम (DTH) ऑपरेटरना तिमाही कामगिरी देखरेख अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, जून 2019 मध्ये, ट्रायने अहवालाच्या विहित नमुन्यात सुधारणा करून त्यामध्ये डीटीएच ऑपरेटर्स , मल्टी सिस्टम ऑपरेटर (MSOs), हेडएंड-इन-द-स्काय (HITS) ऑपरेटर्सचा समावेश करून त्यांनाही हे अहवाल सादर करण्याची अट लागू केली होती.
टॅरिफ ऑर्डर, इंटरकनेक्शन रेग्युलेशन आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस रेग्युलेशनसह नियामक फ्रेमवर्कमध्ये अधिसूचित केलेल्या सुधारणा लक्षात घेऊन, ट्रायने आता अहवालांच्या विहित नमुन्यात फेरबदल केले आहेत. हे सुधारित स्वरुपातील नमुने सर्व डीपीओना अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या सध्याच्या ऑर्डरशी संलग्न आहेत.
त्यानुसार, सर्व डीपीओंनी अहवाल ट्रायकडे पाठवताना पुढील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
(i) प्रत्येक महिना संपल्यापासून दहा दिवसांच्या आत मासिक कामगिरी देखरेख अहवाल विहित नमुन्यात (परिशिष्ट-I) पाठवणे; आणि
(ii) प्रत्येक तिमाही संपल्यापासून पंधरा दिवसांच्या आत त्रैमासिक कामगिरी देखरेख अहवाल विहित नमुन्यात (परिशिष्ट-II) सादर करणे,
ज्या डीपीओच्या सक्रिय सदस्यांची संख्या, मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, तीस हजारांपेक्षा जास्त नसेल त्यांच्यासाठी त्रैमासिक कामगिरी देखरेख अहवालच्या अटीची पूर्तता करणे ऐच्छिक असेल
आदेशाची प्रत ट्रायच्या संकेतस्थळावर (www.trai.gov.in) उपलब्ध आहे.
काही स्पष्टीकरण/माहिती हवी असल्यास, अभय शंकर वर्मा, मुख्य सल्लागार (B&CS), यांच्याशी ईमेल: pradvbcs@trai.gov.in किंवा फोन: +91-11-20907761 वर संपर्क साधता येईल.
***
SushamaKane/ManjiriGanoo/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165203)
Visitor Counter : 2