पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        नेपाळमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनांच्या अध्यक्षतेखाली  सुरक्षा संबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                09 SEP 2025 10:28PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                हिमाचल प्रदेश व  पंजाबच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी   सुरक्षा संबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. अनेक युवकांचा बळी  घेणाऱ्या हिंसाचाराबद्दल पंतप्रधानांनी तीव्र खेद व्यक्त केला. त्यांनी नेपाळच्या जनतेला शांतता व एकात्मतेच्या तत्वांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले. ‘एक्स’ वरील आपल्या निरनिराळ्या संदेशांमध्ये त्यांनी लिहिले,
“हिमाचल प्रदेश व पंजाबच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर आज मी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी  सुरक्षा संबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक  घेतली. नेपाळमधील हिंसाचार वेदनादायी आहे. अनेक युवकांचा यात बळी गेल्याने मला अतिशय दुःख झाले आहे. नेपाळमधील स्थैर्य, शांतता आणि समृद्धी आमच्यासाठी सर्वात  महत्वाची आहे.  मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू भगिनींना शांतता राखण्याचे आवाहन करत आहे.”
 
 
 
***
SushamaKane/UmaRaikar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2165170)
                Visitor Counter : 8
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam