दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दुबई येथील युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऐतिहासिक यूपीआय-यूपीयूचा केला प्रारंभ


जागतिक टपाल क्षेत्राला बळकटी देण्यासाठी भारताकडून 10 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स : दुबईतल्या यूपीयू महासभेत ज्योतिरादित्य सिंधिया यांची ग्वाही

जागतिक टपाल शिखर परिषदेमध्ये दोन प्रमुख यूपीयू परिषदांसाठी भारताचा दावा सिंदिया यांनी केला घोषित

Posted On: 09 SEP 2025 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025

दुबई येथे आयोजित 28 व्या  युनिव्हर्सल  पोस्टल काँग्रेसमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ऐतिहासिक यूपीआय-यूपीयूचा प्रारंभ केला. जगभरातल्या लक्षावधी लोकांसाठी सीमापार वित्तप्रेषणात क्रांती घडवण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल आहे. 

यूएईमधल्या दुबई येथे आयोजित 28 व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये प्रतिनिधींना संबोधित करताना ज्योतिरादित्य सिंदिया 

टपाल विभाग, एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि युनिव्हर्सल पोस्टल युनियन यांनी विकसित केलेला हा उपक्रम भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला यूपीयू इंटरकनेक्शन प्लॅटफॉर्मशी जोडतो. यामुळे टपाल जाळ्याची पोहोच यूपीआयच्या गती आणि किफायतशीरतेला जोडली जाईल. 

"तंत्रज्ञानविषयक प्रारंभापेक्षा हा एक सामाजिक प्रभाव" ठरणार असल्याचे सिंदिया यांनी सांगितले."टपाल जाळ्याची विश्वासार्हता यूपीआयच्या गतीशी जोडली जाणार म्हणजे सीमापार असलेली कुटुंबे जलद, सुरक्षित आणि खूपच कमी खर्चात पैसे पाठवू शकतात. नागरिकांसाठी उभारलेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा, मानवतेची अधिक चांगली सेवा करण्यासाठी सीमापार जोडल्या जाऊ शकतात, याची पुष्टी यातून होते."

त्यांनी आधुनिक,समवेशक टपाल क्षेत्रासाठी भारताच्या दृष्टीकोनाची रूपरेषा मांडली. चार स्तंभांवर ती उभारलेली आहे."अखंड डेटाचालित लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून जोडणे, प्रत्येक स्थलांतरित आणि डिजिटल उद्योगाला परवडणाऱ्या डिजिटल वित्तीय सेवा देऊन त्यांना समाविष्ट करणे; एआय, डिजीपिन आणि मशीन लर्निंगसह आधुनिकीकरण करणे; आणि यूपीयू-समर्थित तांत्रिक सेलसह दक्षिण-दक्षिण भागीदारीद्वारे सहकार्य करणे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार डिजिटल इंडिया आणि विकसित भारताच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल यामध्ये भारतीय टपाल विभाग प्रमाण आणि समावेशकतेचे एक सामर्थ्यशाली उदाहरण म्हणून आपल्यासमोर आहे. हे अधोरेखित करुन सिंदिया म्हणाले की आधार, जनधन आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या साहाय्याने आपण 56 कोटींहून अधिक खाती उघडली आहेत आणि त्यापैकी बहुतेक खाती महिलांच्या नावे आहेत. भारतीय टपाल विभागाने गेल्या वर्षी सुमारे 90 कोटी पत्रे आणि पार्सल्सचे वितरण केले. जागतिक स्तरावर आम्ही आणत असलेल्या समावेशनाचे प्रमाण आणि भावना हीच आहे.”

जागतिक टपाल सहकार्य अधिक भक्कम करणे : ज्योतिरादित्य एम. सिंदिया आणि युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे महासंचालक - मासाहिको मेटोकी  

या काळात तंत्रज्ञानाचा प्रवाह नवोन्मेषात परिवर्तित करण्यासाठी ई कॉमर्स आणि डिजिटल पेमेन्टवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने  सिंदिया यांनी 10 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाला पुढे नेत असताना भारत कशाप्रकारे आपली साधनसंपत्ती, नैपुण्य आणि मैत्री यासाठी सदैव तत्पर आहे, त्याचा पुनरुच्चार सिंदिया यांनी केला. 

जागतिक टपाल समुदायासाठी एक जोडलेले, समावेशक आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करून, सिंदिया यांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या प्रशासन परिषद आणि पोस्टल ऑपरेशन्स परिषदेसाठी भारताची उमेदवारी जाहीर केली. 

दुबई येथे भरलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन कायदेमंडळाच्या 28 व्या संमेलनादरम्यान आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले " भारत तुमच्याकडे केवळ प्रस्ताव घेऊन येत नाही तर भागीदारी घेऊन येत आहे. आम्ही लवचिकतेवर विश्वास ठेवतो, महागडे विभाजन टाळणारे आंतर-कार्यक्षम उपाय सक्षम करतो आणि विश्वास, पेमेंट, ओळख, पत्ता आणि लॉजिस्टिक्स जोडतो जेणेकरून जागतिक व्यापार सुरळीत होईल.”

 

शैलेश पाटील/सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2164925) Visitor Counter : 2