पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मध्यमवर्गाला समर्थन देण्याच्या सरकारच्या दृढ वचनबद्धतेवर दिला भर

Posted On: 04 SEP 2025 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तनामागील प्रेरक शक्ती असणाऱ्या मध्यमवर्गाला समर्थन देण्याच्या सरकारच्या दृढ वचनबद्धतेवर भर दिला. 

ऐतिहासिक प्राप्तिकर कपातीच्या मालिकेवर आधारित, नवीनतम #NextGenGST सुधारणा लक्ष्यित सवलत सादर करतात ज्यामुळे टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह घरगुती उत्पादने लाखो कुटुंबांसाठी अधिक किफायतशीर बनतात.

सुनील वाचानी यांच्या एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टला दिलेल्या उत्तरात मोदी म्हणाले:

"भारताचा कष्टाळू मध्यमवर्ग आपल्या विकास प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे.

ऐतिहासिक प्राप्तिकर कपात आणि आता #NextGenGST सुधारणांद्वारे टीव्ही, एसी आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसारखी उत्पादने अधिक परवडणारी होत आहेत, आम्ही अधिक सुलभ राहणीमानासाठी आणि कोट्यवधी कुटुंबांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत."

India’s hardworking middle class is at the heart of our growth journey.

Through historic income tax cuts and now #NextGenGST reforms that make products like TVs, ACs and everyday essentials more affordable, we are committed to enhancing ease of living and supporting the… https://t.co/6xmHmZIuTm

— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2025

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164022) Visitor Counter : 2