शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शैक्षणिक संस्थासाठीचे भारतीय मानांकन 2025 केले जारी

Posted On: 04 SEP 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भारतीय मानांकन 2025 जाहीर केले. हे मानांकन 2015 मध्ये शिक्षण मंत्रालयाने या उद्देशासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन  फ्रेमवर्क (एनआयआरएफ) नुसार लागू करण्यात आले आहे. याप्रसंगी शिक्षण आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री  सुकांता मजुमदार यांच्यासह उच्च शिक्षण संस्थांचे कुलगुरू आणि संचालक उपस्थित होते.

एनआयआरएफ 2025 मानांकने  आपल्या संस्थांची ताकद आणि विद्यार्थ्यांचे सामर्थ्य दर्शवतात, असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना सांगितले.

एनआयआरएफ भविष्यात एक सर्वोत्तम मान्यता प्रणाली म्हणून विकसित होईल, ज्यात अधिक डेटा-आधारित दृष्टिकोन असतील, अधिक मानांकन मापदंड आणि श्रेणी समाविष्ट होतील आणि अधिकाधिक संस्था त्यात सहभागी होतील, असा आपल्याला विश्वास आहे  असे प्रधान म्हणाले.

आपण एक मोठी झेप घेण्यासाठी अतिशय योग्य स्थितीत आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन केले होते याची आठवण करून देत  ते म्हणाले की आपल्याला ‘स्वराज’ मिळाले आहे आणि आता आपल्याला ‘समृद्धी’साठी संघर्ष करायचा आहे.

आपल्या शैक्षणिक संस्था याच्या केंद्रस्थानी आहेत  आणि ‘समृद्धी’ आणि ‘आत्मनिर्भरता’यासाठी एक आराखडा तयार करण्यात त्यांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना केंद्रीय मंत्र्यांनी नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी एक ध्येयासक्त स्थान बनवण्याचे, एनआयआरएफ चौकटीत सहभागी होण्याचे आणि जागतिक स्तरावर सर्वात जास्त मागणी असलेल्या संस्थांमध्ये रूपांतरित होण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय शिक्षण आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार म्हणाले की, भारताच्या उच्च शिक्षण प्रणालीने अभूतपूर्व प्रमाणात व्याप्ती आणि सर्वसमावेशकता वाढवली आहे. यावर्षी 14,000 हून अधिक संस्था सहभागी झाल्याने, एनआयआरएफ एक विश्वासार्ह चौकट बनली आहे, जी केवळ संस्थांना मानांकन देत नाही तर गुणवत्ता, सचोटी आणि नवोन्मेष यांनाही चालना देते. भारताच्या मानांकनाला एक दशक पूर्ण होत असताना, हा प्रवास आपल्या विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या लवचिकतेचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंब आहे.

भारतीय मानांकनांची पहिली आवृत्ती 2016 मध्ये एका श्रेणीत आणि तीन विषय क्षेत्रांमध्ये म्हणजेच विद्यापीठे, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि फार्मसी मध्ये जाहीर झाली होती. त्यानंतर 2017 ते 2025 पर्यंत नवीन श्रेणी आणि विषय क्षेत्रे जोडली गेली आणि सुरुवातीच्या एका श्रेणी आणि तीन विषय क्षेत्रांमधून आता 9 श्रेणी आणि 8 विषय क्षेत्रापर्यंत पोहोचली आहेत:

Sl.

No.

Categories

Year

Sl.

No.

Subject domains

Year

1

Universities

2016

1

Engineering

2016

2

Overall

2017

2

Management

2016

3

Colleges

2017

3

Pharmacy

2016

4

Research Institutions

2021

4

Architecture & Planning

2018

5

Innovation

2023

5

Law

2018

6

State Public Universities

2024

6

Medical

2018

7

Open Universities

2024

7

Dental

2020

8

Skill Universities

2024

8

Agriculture & Allied Sectors

2023

9

Sustainable Development Goals

2025

 

पाच विस्तृत श्रेणींची मानके आणि भारांकन

सप्टेंबर 2015 मध्ये शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली एनआयआरएफ या आवृत्तीसाठी तसेच 2016 ते 2024 या वर्षांसाठी जाहीर झालेल्या भारतीय मानांकनाच्या मागील नऊ आवृत्त्यांसाठी वापरण्यात आली होती. एनआयआरएफ मध्ये ओळखल्या गेलेल्या मानकांच्या पाच विस्तृत श्रेणी आणि त्यांचे 10 पैकी भारांकन खालीलप्रमाणे दिले आहे:

Sl.

No.

Parameter

Marks

Weightage

1

Teaching, Learning & Resources

100

0.30

2

Research and Professional Practice

100

0.30

3

Graduation Outcome

100

0.20

4

Outreach and Inclusivity

100

0.10

5

Perception

100

0.10

 

'भारतीय मानांकन' साठी अर्ज करणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ

या वर्षी, एकूण 7692 संस्थांनी ‘एकूण’, श्रेणी-निहाय  किंवा क्षेत्र-निहाय  मानांकनासाठी अर्ज केले. या वर्षी मानांकन प्रक्रियेत संस्थांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे, जे हे दर्शविते की भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये या मानांकनाला एक निष्पक्ष आणि पारदर्शक प्रक्रिया म्हणून मान्यता मिळाली आहे.

भारतीय मानांकनासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांची संख्या 2016 मधील 2426 वरून वाढून 2025 मध्ये 7692 झाली आहे, तर विविध श्रेणींसाठी अर्ज करणाऱ्या एकूण अर्जांची संख्या 2016 मधील 3,565 वरून वाढून 2025 मध्ये 14,163 झाली आहे.

भारतीय क्रमवारीत 2016 ते 2025 पर्यंत स्थान मिळवणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ

पूर्वीच्या पद्धतींनुसार, एकूणात, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापन या प्रत्येक श्रेणीत प्रत्येकी 100 संस्थांची क्रमवारी लावली जाते.

वास्तुकला आणि नियोजन, विधी, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कृषी आणि संबंधित क्षेत्रे तसेच संशोधन संस्था यासारख्या विषयांच्या क्षेत्रात, 40 ते 50 संस्थांची क्रमवारी लावली जाते. उदयोन्मुख आणि विशेष श्रेणींमध्ये, मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठे यांना पात्र सहभागींची तुलनेने कमी संख्या असल्याने प्रत्येकी तीन संस्थांचे रॅंकिंग केले जाते.

भारतीय मानांकन  2025 मधील प्रमुख वैशिष्ट्ये:

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने सलग सातव्या वर्षी समग्र  (ओव्हरऑल) या श्रेणीत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे,
  • समग्र या श्रेणीत, सर्वोत्कृष्ट 100 मध्ये 24 राज्य सार्वजनिक विद्यापीठे, 22 खाजगी अभिमत विद्यापीठे, 19 आयआयटी आणि आयआयएससी, 9 खाजगी विद्यापीठे, 8 एनआयटी, 7 केंद्रीय विद्यापीठे, 5 वैद्यकीय संस्था (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत), 4 आयएसएसईआर, 1 महाविद्यालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत आयएआरआय यांचा समावेश आहे.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू सलग दहाव्या वर्षी विद्यापीठांच्या श्रेणीत अव्वल स्थानी आहे
  • आयआयएम अहमदाबादने व्यवस्थापन श्रेणीत अव्वल स्थान सलग सहाव्या वर्षीही कायम राखले आहे, 
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली सलग आठव्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रात अव्वल स्थानावर आहे,
  • जामिया हमदर्द, नवी दिल्ली औषधनिर्माण श्रेणीत सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर. या श्रेणीत जामिया हमदर्द सलग चार वर्षे पहिल्या क्रमांकावर होती.
  • हिंदू कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालय श्रेणीत पहिले स्थान पटकावले आहे, यापूर्वी मिरांडा हाऊसने सलग सात वर्षे पहिले स्थान कायम ठेवले होते.
  • आयआयटी रुरकीने वास्तुकला आणि नियोजन श्रेणीत सलग पाचव्या वर्षी पहिले स्थान कायम राखले आहे,
  • नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरूने सलग आठव्या वर्षी विधी श्रेणीत पहिले स्थान कायम राखले आहे.
  • दिल्लीतील महाविद्यालयांनी महाविद्यालय श्रेणीत आपले वर्चस्व कायम राखले आहे, या श्रेणीतील पहिल्या 10 महाविद्यालयांपैकी 6 महाविद्यालये दिल्लीतीलच.
  • 2022 ते 2024 या काळात सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकावर असलेल्या सविता  इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस, चेन्नईला मागे टाकत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्लीने प्रथमच दंत चिकित्सा श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्लीने सलग तिसऱ्या वर्षी, म्हणजे 2023 ते 2025 पर्यंत कृषी आणि संलग्न क्षेत्र श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • जादवपूर विद्यापीठ, कोलकाता’ने 2024 मध्ये सुरू झालेल्या राज्य सार्वजनिक विद्यापीठ श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू), नवी दिल्लीने सलग दुसऱ्या वर्षी, म्हणजे 2024 - 2025 मध्ये मुक्त विद्यापीठ श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रासने नवोन्मेष श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. 
  • सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू), पुणे सलग दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2024 आणि 2025 मध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीत अव्वल आहे.
  • याच वर्षी सुरू करण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) श्रेणीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास अव्वल स्थानी आहे.

भारतीय मानांकन 2025 पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://www.nirfindia.org/2025/Ranking.html

 

भारतीय मानांकन 2025 : विविध श्रेणी / विषयांमध्ये सर्वोत्कृष्ट 3 ते 10व्या स्थानावरील संस्था

Overall

Name

Rank

Indian Institute of Technology Madras

1

Indian Institute of Science, Bengaluru

2

Indian Institute of Technology Bombay

3

Indian Institute of Technology Delhi

4

Indian Institute of Technology Kanpur

5

Indian Institute of Technology Kharagpur

6

Indian Institute of Technology Roorkee

7

All India Institute of Medical Sciences, Delhi

8

Jawaharlal Nehru University, New Delhi

9

Banaras Hindu University, Varanasi

10

 

 

 

Universities

Name

Rank

Indian Institute of Science, Bengaluru

1

Jawaharlal Nehru University, New Delhi

2

Manipal Academy of Higher Education, Manipal

3

Jamia Millia Islamia, New Delhi

4

University of Delhi, Delhi

5

Banaras Hindu University, Varanasi

6

Birla Institute of Technology & Science - Pilani

7

Amrita Vishwa Vidyapeetham, Coimbatore

8

Jadavpur University, Kolkata

9

Aligarh Muslim University, Aligarh

10

 

 

 

Colleges

Name

Rank

Hindu College, Delhi

1

Miranda House, Delhi

2

Hans Raj College, Delhi

3

Kirori Mal College, Delhi

4

St. Stephens's College, Delhi

5

Rama Krishna Mission Vivekananda Centenary College, Kolkata

6

Atma Ram Sanatan Dharm College, New Delhi

7

St. Xavier`s College, Kolkata

8

PSGR Krishnammal College for Women, Coimbatore

9

PSG College of Arts and Science, Coimbatore

10

 

 

 

Research Institutions

Name

Rank

Indian Institute of Science, Bengaluru

1

Indian Institute of Technology Madras

2

Indian Institute of Technology Delhi

3

Indian Institute of Technology Bombay

4

Indian Institute of Technology Kharagpur

5

 

 

 

Innovation Institutions

Name

Rank

Indian Institute of Technology Madras

1

Indian Institute of Technology Bombay

2

Indian Institute of Science, Bengaluru

3

Indian Institute of Technology Kharagpur

4

Indian Institute of Technology Kanpur

5

 

 

Open Universities

Name

Rank

Indira Gandhi National Open University (IGNOU), New Delhi

1

Karnataka State Open University, Mysore

2

U.P. Rajarshi Tandon Open University, Allahabad

3

 

 

Skill Universities

Name

Rank

Symbiosis Skills and Professional University, Pune

1

Symbiosis University of Applied Sciences, Indore

2

Shri Vishwakarma Skill University, Palwal

3

 

 

State Public Universities

Name

Rank

Jadavpur University, Kolkata

1

Anna University, Chennai

2

Panjab University, Chandigarh

3

Andhra University, Visakhapatnam

4

Kerala University, Thiruvananthapuram

5

Cochin University of Science and Technology, Cochin

6

Osmania University, Hyderabad

7

University of Kashmir, Srinagar

8

Gauhati University, Guwahati

9

Bharathiar University, Coimbatore

10

 

 

SDGs Institutions

Name

Rank

Indian Institute of Technology Madras

1

Indian Agricultural Research Institute, New Delhi

2

Jamia Millia Islamia, New Delhi

3

 

Engineering

Name

Rank

Indian Institute of Technology Madras

1

Indian Institute of Technology Delhi

2

Indian Institute of Technology Bombay

3

Indian Institute of Technology Kanpur

4

Indian Institute of Technology Kharagpur

5

Indian Institute of Technology Roorkee

6

Indian Institute of Technology Hyderabad

7

Indian Institute of Technology Guwahati

8

National Institute of Technology Tiruchirappalli

9

Indian Institute of Technology (Banaras Hindu University) Varanasi

10

 

 

Management

Name

Rank

Indian Institute of Management Ahmedabad

1

Indian Institute of Management Bangalore

2

Indian Institute of Management Kozhikode

3

Indian Institute of Technology Delhi

4

Indian Institute of Management Lucknow

5

Indian Institute of Management, Mumbai

6

Indian Institute of Management Calcutta

7

Indian Institute of Management Indore

8

Management Development Institute, Gurugram

9

XLRI - Xavier School of Management, Jamshedpur

10

 

 

Pharmacy

Name

Rank

Jamia Hamdard, New Delhi

1

Birla Institute of Technology & Science -Pilani

2

Panjab University, Chandigarh

3

JSS College of Pharmacy, Ooty

4

National Institute of Pharmaceutical Education and Research Hyderabad

5

Institute of Chemical Technology, Mumbai

6

JSS College of Pharmacy, Mysuru

7

Manipal College of Pharmaceutical Sciences, Manipal

8

National Institute of Pharmaceutical Education and Research, Mohali

9

S.R.M. Institute of Science and Technology, Chennai

10

 

Medical

Name

Rank

All India Institute of Medical Sciences, New Delhi

1

Post Graduate Institute of Medical Education and Research, Chandigarh

2

Christian Medical College, Vellore

3

Jawaharlal Institute of Post Graduate Medical Education & Research, Puducherry

4

Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences, Lucknow

5

 

 

Dental

Name

Rank

All India Institute of Medical Sciences, New Delhi

1

Saveetha Institute of Medical and Technical Sciences, Chennai

2

Maulana Azad Institute of Dental Sciences, Delhi

3

Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Pune

4

Manipal College of Dental Sciences, Manipal

5

 

 

Law

Name

Rank

National Law School of India University, Bengaluru

1

National Law University, New Delhi

2

Nalsar University of Law, Hyderabad

3

The West Bengal National University of Juridical Sciences, Kolkata

4

Gujarat National Law University, Gandhinagar

5

 

 

Architecture and Planning

Name

Rank

Indian Institute of Technology Roorkee

1

National Institute of Technology Calicut

2

Indian Institute of Technology Kharagpur

3

Indian Institute of Engineering Science and Technology, Shibpur

4

Jamia Millia Islamia, New Delhi

5

 

 

Agriculture and Allied Sectors

Name

Rank

Indian Agricultural Research Institute, New Delhi

1

ICAR - National Dairy Research Institute, Karnal

2

Punjab Agricultural University, Ludhiana

3

Banaras Hindu University, Varanasi

4

Indian Veterinary Research Institute, Izatnagar

5

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163903) Visitor Counter : 2