पंतप्रधान कार्यालय
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
Posted On:
01 SEP 2025 1:47PM by PIB Mumbai
आपल्याला भेटून अत्यंत आनंद झाला. आपली भेट हा एक संस्मरणीय क्षण असतो असे मला नेहमी वाटत आले आहे. या भेटीत अनेक गोष्टींच्या माहितीचे परस्परांमध्ये देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते.
आपण सतत संपर्कात राहिलो आहोत. दोन्ही देशांमध्ये नियमितपणे अनेक उच्चस्तरीय बैठकाही पार पडल्या आहेत. यंदा डिसेंबरमध्ये होणाऱ्या आपल्या 23व्या शिखर परिषदेसाठी 140 कोटी भारतीय नागरिक उत्सुकतेने आपल्या आगमनाची वाट पाहत आहेत.
महामहीम
हे आपल्या विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीची गहनता आणि व्याप्ती दर्शवते. अतिशय कठीण परिस्थितीतही भारत आणि रशिया नेहमीच परस्परांच्या सोबतीने वाटचाल करत आहेत.. आपले जवळचे सहकार्य केवळ दोन्ही देशांच्या जनतेसाठीच नव्हे, तर जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठीही महत्त्वपूर्ण आहे.
महामहीम,
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण सातत्याने चर्चा केली आहे. अलीकडेच शांततेसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. सर्व पक्ष रचनात्मकतेने पुढे जातील, अशी आम्हाला आशा आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपवून कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग शोधावा लागेल. ही संपूर्ण मानवतेची हाक आहे.
महामहीम, पुन्हा एकदा मी आपले मनापासून खूप खूप आभार मानतो.
***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162647)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam