सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादनाचे तिमाही अंदाज


आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील 6.5% वृद्धीदराच्या तुलनेत 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन 7.8% ने वाढण्याचा अंदाज

सेवा क्षेत्रातील दमदार वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत 7.6% ची वास्तविक सकल मूल्यवर्धनाची केली नोंद

Posted On: 29 AUG 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय  या प्रसिद्धीपत्रकात  आर्थिक वर्ष 2025-26 च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तिमाही अंदाजांसह त्याच्या खर्चाच्या घटकांसह स्थिर (2011-12) आणि चालू किमतीवर आधारित अंदाज  जारी करत आहे. विविध आर्थिक क्षेत्रांसाठी मूलभूत किंमतींनुसार सकल मूल्यवर्धनाचा तिमाही अंदाज, वर्ष-दर-वर्ष टक्केवारीतील बदल, आर्थिक वर्ष 2023-24, 2024-25 आणि  2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठी स्थिर (2011-12) आणि चालू किंमतींनुसार  जीडीपीचे व्यय घटक, परिशिष्ट A च्या विवरणपत्रे 1 ते  4 मध्ये दिले आहेत.

ठळक वैशिष्ट्ये –

• आर्थिक वर्ष 2025-26  च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन 7.8% ने वाढण्याचा अंदाज आहे,  आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत हा दर 6.5% होता.

• आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत नॉमिनल जीडीपी वाढ 8.8% दिसून आली.

• कृषी आणि संलग्न क्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नोंदवलेल्या 1.5%  वाढीच्या तुलनेत 3.7% वास्तविक सकल मूल्यवर्धन वाढीचा दर नोंदवला आहे.

• दुय्यम क्षेत्रे, प्रामुख्याने वस्तुनिर्माण  (7.7%) आणि बांधकाम (7.6%) क्षेत्रांनी या तिमाहीत स्थिर किमतींवर 7.5% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

• खाणकाम आणि उत्खनन (-3.1%) आणि वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवा क्षेत्र (0.5%) या मध्ये  आर्थिक वर्ष  2025-26 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक वाढीचा दर घटल्याचे दिसून आले.

• तृतीयक क्षेत्राने (9.3%)  आर्थिक वर्ष  2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील  6.8% च्या वाढीच्या दराच्या तुलनेत  स्थिर किमतींवर लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

• सरकारी अंतिम उपभोग खर्च (GFCE) मध्ये आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत 9.7% वाढ नोंदली गेली , आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत हा दर 4.0 होता.

आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत रिअल प्रायव्हेट फायनल कन्झम्प्शन एक्सपेंडिचर (PFCE) ने 7.0 % वाढ नोंदवली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 8.3%  होती.

• सकल स्थिर भांडवल निर्मिती (GFCF) ने 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील   6.7% वाढीच्या दराच्या तुलनेत स्थिर किंमतींवर 7.8% वाढ नोंदवली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

सोनाली काकडे/सुषमा काणे/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2162088) Visitor Counter : 17