संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन व विकास संघटनेकडून एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण
Posted On:
24 AUG 2025 12:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2025
डीआरडीओ- संरक्षण संशोधन व विकास संघटनेने 23 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्लूएस) पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केली. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची ही बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली असून त्यामध्ये पूर्णतः स्वदेशी विकसित शिघ्र प्रतिसाद जमिन-ते-आकाश क्षेपणास्त्रे (क्यूआरएसएएम), प्रगत अति-लघु पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्रे आणि उच्च-शक्तीच्या लेझरवर आधारित लक्ष्यित ऊर्जा शस्त्र प्रणाली (डीईडब्लू) यांचा समावेश आहे.
या सर्व शस्त्र प्रणाली घटकांचे एकात्मिक संचालन केंद्रीकृत कमांड व नियंत्रण केंद्रामार्फत केले जाते. हे केंद्र संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळेने विकसित केले आहे, जी या कार्यक्रमाची प्रमुख प्रयोगशाळा आहे. व्हीएसएचओआरएडीएस हे रिसर्च सेंटर इमारत यांनी विकसित केले आहे तर डीईडब्लू हे सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टीम्स अँड सायन्सेस यांनी विकसित केले आहे.

उड्डाण चाचण्यांदरम्यान, तीन वेगवेगळे लक्ष्य दोन उच्च-गती असलेली स्थिर पंखांची मानवरहित हवाई वाहने आणि एक मल्टी-कॉप्टर ड्रोन यांना एकाच वेळी लक्ष्य करून अनुक्रमे क्यूआरएसएएम, व्हीएसएचओआरएडीएस आणि उच्च-ऊर्जा लेझर शस्त्र प्रणालीद्वारे पूर्णतः नष्ट करण्यात आले. क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन शोध व नाश प्रणाली, शस्त्र प्रणाली कमांड व नियंत्रण प्रणाली, तसेच दळणवळण आणि रडार प्रणालीसह सर्व घटकांनी यशस्वीरीत्या कामगिरी केली. या सर्वाची पुष्टी चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रात तैनात यंत्रणांनी उड्डाण आकडेवारी संकलित केली. डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि सशस्त्र दलांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीच्या पहिल्या यशस्वी उड्डाण चाचणी बदल डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्राचे कौतुक केले. या उड्डाण चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सिद्ध झाली असून शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वाच्या सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी क्षेत्रीय संरक्षण आणखी बळकट होईल, असे सिंह म्हणाले.
संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनीही या यशस्वी उड्डाण चाचणीमध्ये सहभागी पथकांचे अभिनंदन केले.
* * *
आशिष सांगळे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160271)