भारतीय निवडणूक आयोग
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 2025 साठी भारतीय निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नेमणूक
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2025 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025
1.भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करत भारतीय निवडणूक आयोगाने आगामी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 2025 साठी निरीक्षक म्हणून केंद्र सरकारच्या अपर सचिव श्रेणीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
2. निवडणूक आयोगाने दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी उपराष्ट्रपतीपद निवडणूक 2025 साठी अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीचे मतदान तसेच मतमोजणी दिनांक 9 सप्टेंबर, 2025 रोजी होईल.
3. खालील अधिकाऱ्यांची या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे:
- सुशील कुमार लोहाणी, भारतीय सनदी अधिकारी (ओडी:1995), केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे अपर सचिव
- डी.आनंदन, भारतीय सनदी अधिकारी (एसके:2000), केंद्रीय अर्थ मंत्रालयातील व्यय विभागाचे अपर सचिव
4. नितीन कुमार शिवदास खाडे, भारतीय सनदी अधिकारी (एएम:2004), केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयातील भू संसाधन विभागाचे संयुक्त सचिव यांना राखीव यादीत ठेवले आहे.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2159555)
आगंतुक पटल : 7