माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय भाषांमधील कृत्रिम बुद्धिमत्ताधारित तात्काळ भाषांतराला चालना देण्यासाठी भाषासेतू हा आव्हानात्मक उपक्रम
सुरुवातीला 12 भाषांचा समावेश; लवकरच संस्कृत आणि डोग्रीसह आणखी 10 भाषांपर्यंतचा विस्तार अपेक्षित
बहुभाषिक भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण विषयक स्वदेशी नवोन्मेषांना केंद्र सरकारचे पाठबळ
Posted On:
20 AUG 2025 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
विविध भारतीय भाषांमधील आशय आणि मजकुराचे भाषांतर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा केंद्र सरकारच्या भाषासेतू या आव्हानात्मक मुख्य उद्देश आहे. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षणाचा उपयोग करून घेत भारतीय भाषांसाठी वास्तविक अर्थात प्रत्यक्ष त्या वेळी भाषांतर करू शकणार्या उपाययोजना आणि साधने विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे हे देखील या आव्हानात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या आव्हानात्मक उपक्रमाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानात सुरुवातीला आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, हिंदी, ओरिया, पंजाबी, तेलुगू, तमिळ आणि उर्दू या 12 भारतीय भाषांचा समावेश असेल.
भविष्यात आणखी 10 भाषांना जोडता येईल अशा प्रकारे हे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. यात काश्मिरी, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी, संस्कृत, सिंधी, बोडो, संथाली, मैथिली आणि डोग्री या भाषांचा समावेश असेल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158649)