पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 19 AUG 2025 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान  मोदी म्हणाले की, त्रिपुराच्या विकासासाठी महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांनी केलेले प्रयत्न अनुकरणीय असून, त्याचे  कौतुक केले जाते. त्यांना असलेली सार्वजनिक सेवेची आवड, गरिबांना सक्षम बनवण्याविषयी त्यांची वचनबद्धता आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पण यामुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळते, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. 

पंतप्रधानांनी समाज माध्‍यम ‘एक्स’ वर पोस्ट केले;

“महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. त्रिपुराच्या विकासासाठी त्यांच्या अनुकरणीय प्रयत्नांचे कौतुक केले जाते. सार्वजनिक सेवेची त्यांची आवड, गरीबांना सक्षम बनवण्याची त्यांची वचनबद्धता आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पण आपल्याला खूप प्रेरणा देत आहे. केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकार त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.”

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2158182) अभ्यागत कक्ष : 23