पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीविषयीचे त्यांचे विचार पंतप्रधानांबरोबर केले सामायिक
संघर्षावर शांततापूर्ण रीतीने तोडगा काढण्यासाठी भारताची सातत्यपूर्ण भूमिका अधोरेखित करत यासंदर्भातील सर्व प्रयत्नांना भारताच्या पाठिंब्याचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याशी निगडित अनेक मुद्द्यांवर केला विचारविनिमय
दोन्ही नेत्यांची परस्परांच्या संपर्कात राहण्यासाठी सहमती
Posted On:
18 AUG 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दूरध्वनी आला.
गेल्या आठवड्यात अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दलचे त्यांचे विचार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सामायिक केले.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षावर मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून शांतातापूर्ण रीतीने तोडगा काढण्याची भारताची सातत्यपूर्ण भूमिका अधोरेखित केली. यासंदर्भातील प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल असा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157647)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam