पंतप्रधान कार्यालय
चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
15 AUG 2025 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.
समाज माध्यम ‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले,
“चित्रपटसृष्टीमध्ये 50 वर्ष गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांतजी यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहिला असून, त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी पिढ्यान्-पिढ्यांच्या मनावर कायमस्वरुपी ठसा उमटवला आहे. आगामी काळातही त्यांना सतत यश मिळावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी शुभेच्छा. @rajinikanth"
* * *
सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157043)